Dasara : विजयादशमीच्या मुहूर्तावर कुलाबा किल्याला शिवभक्तांनी बांधले तोरण..!

अलिबाग समुद्रात इतिहासाची साक्ष म्हणून उभा असलेल्या कुलाबा किल्यावर आज विजयादशमी सणाच्या मुहूर्तावर शिवभक्तांनी गोंडयाच्या फुलांचे तोरण बांधले आहे. कुलाबा किल्यावर असलेल्या तोफांचेही यथासांग पूजन केले आहे.
Dasara : विजयादशमीच्या मुहूर्तावर कुलाबा किल्याला शिवभक्तांनी बांधले तोरण..!
Dasara : विजयादशमीच्या मुहूर्तावर कुलाबा किल्याला शिवभक्तांनी बांधले तोरण..! राजेश भोस्तेकर

-- राजेश भोस्तेकर

रायगड : अलिबाग समुद्रात इतिहासाची साक्ष म्हणून उभा असलेल्या कुलाबा किल्यावर आज विजयादशमी सणाच्या मुहूर्तावर शिवभक्तांनी गोंडयाच्या फुलांचे तोरण बांधले आहे. कुलाबा किल्यावर असलेल्या तोफांचेही यथासांग पूजन केले आहे. अलिबागमधील गडवाट प्रवास सह्याद्रीचा, स्वराज्याचे शिलेदार, मावळा प्रतिष्ठानच्या सदस्यामार्फ़त दरवर्षी दसऱ्याला कुलाबा किल्यावर तोरण बांधून आणि शस्त्र पूजन करून हा सण साजरा करतात.

हे देखील पहा :

किल्याचा इतिहास नव्या पिढीला समजावा, किल्याचे जतन आणि संवर्धन व्हावे या उद्देशाने हे शिवभक्त एकत्रित येऊन आपले कार्य करीत असतात. कुलाबा किल्ला हा सरखेल कान्होजी आंग्रे याच्या आरमाराचे प्रमुख ठिकाण होते. त्यामुळे कुलाबा किल्याला स्वतःचा असा इतिहास आहे. कुलाबा किल्ल्यातून सागरावर अधिराज्य सरखेल कान्होजी आंग्रे यांनी अबाधित ठेवले होते. काळानुरूप काही भागात कुलाबा किल्याची पडझड झाली आहे. असे असले तरी किल्याचे प्रवेशद्वार आजही मजबूत आहे.

Dasara : विजयादशमीच्या मुहूर्तावर कुलाबा किल्याला शिवभक्तांनी बांधले तोरण..!
विसापुर किल्यावरील विजयादशमी ची परंपरा २०१ वर्षानंतरही सुरूच!

कुलाबा किल्याच्या प्रवेशद्वारावर आज विजयादशमी सणाच्या दिवशी मावळा प्रतिष्ठान, गडवाट प्रवास सह्याद्रीचा, स्वराज्याचे शिलेदार सदस्य यांनी गोंडयाच्या फुलांचे तोरण लावले. किल्याच्या बुरुजावरही गोंडा फुलांचे तोरण बांधण्यात आले. विजयादशमीला शस्त्राचेही पूजन केले जात असल्याने आणि कुलाबा किल्यात आजही इतिहासाची साक्ष म्हणून असलेल्या तोफा बुरुजातून डोकावत आहे. या तोफांचेही पूजन शिवभक्त सदस्यांनी केले.

Edited By : Krushnarav Sathe

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com