सांगली संस्थानचा सरकारी गणपती विराजमान; साध्या पद्धतीने उत्सव

सांगली संस्थानचा सरकारी गणपती विराजमान; साध्या पद्धतीने उत्सव
sangli

सांगली : सांगलीच्या sangli श्री गणपती पंचायत ट्रस्टच्या सरकारी गणपतीची प्रतिष्ठापना आज साध्या पद्धतीने करण्यात आली. कोणताही शाही लवाजमा न घेता श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन यांच्याहस्ते श्रीं ची पूजा करून सरकारी उत्सवास प्रारंभ झाला. राजवाड्यातील दरबार हॉलमध्ये पारंपारिक सरकारी गणपती विराजमान करण्यात आला. vijaysinhraje-patwardhan-sangli-ganeshotsav-2021-sml80

गणपती पंचायत संस्थानच्यावतीने प्रतिवर्षी पाच दिवस उत्सव साजरा केला जातो. उत्सवाच्या पहिल्या दिवसापासून ते पाचव्या दिवशीच्या विसर्जनापर्यंत शाही वातावरण असते मात्र कोरोना आणि महापूर यामुळे यंदाचा सांगली संस्थानचा गणपती उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. कोणताही शाही डामडोल न करता सरकारची गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी संस्थानचे अधिपती श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन आणि संपूर्ण पटवर्धन कुटुंबियांनी बाप्पाची विधिवत पूजा केली.

sangli
Video पहा : आले रे आले चोर गणपती आले; उत्सवास प्रारंभ

यावेळी गणपती संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकरासह कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कोरोनाचे संकट दूर व्हावे यासाठी पटवर्धन कुटुंबियांनी गणराया चरणी प्रार्थना केली. दरम्यान पाच दिवस साध्या पद्धतीनेच उत्सव साजरा केला जाईल आणि सांगलीकर जनतेनेही कोरोना नियमांचे पालन करीत उत्सव साजरा करावा असे आवाहन संस्थानाकडून करण्यात आले आहे.

edited by : siddharth latkar

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com