लोकसभा निवडणुकीपूर्वीच खासदार सुजय विखे हे लंकेंना घाबरलेत

लोकसभा निवडणुकीपूर्वीच खासदार सुजय विखे हे लंकेंना घाबरलेत
खासदार डॉ. सुजय विखे पाटील.

अहमदनगर ः मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतर राज्यातील भारतीय जनता पक्ष सक्रिय झाला आहे. खास करून ज्या विधानसभा मतदारसंघात उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला, तेथील नेत्यांनी उचल खाल्ली आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील हेही मतदारसंघात दौरे करू लागले आहेत. शिवसेना नेत्यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर कंबर कसली आहे.

खासदार विखे पाटील यांनी सर्व तालुक्यांचा नुकताच दौरा केला. कर्जत-जामखेडमध्ये गेल्यानंतर त्यांनी रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र डागले. केंद्र सरकारने केलेल्या कामांचे तुम्ही क्रेडिट घेऊन आपल्या नावावर खपवू नका, असा त्यांच्या टीकेचा रोख होता. तर भाजपचेच दुसरे नेते राम शिंदे यांनीही कार्यपद्धतीवरून रोहित पवार यांना धारेवर धरले. एकदाच मतदारसंघात येतात आणि त्याचे आठवडाभर फोटो टाकत बसतात, अशी त्यांची टीका होती.Vikhe Patil deliberately criticizes Nilesh Lanke

खासदार डॉ. सुजय विखे पाटील.
पंकजा मुंडे : ना धड दबाव ना धड प्रभाव

पारनेरमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रसचे नीलेश लंके हे आमदार आहेत. त्यांनी कोरोनाच्या काळात मोठे काम केले आहे. देशभरातून त्यांची वाहवा झाली. लंके यांच्या लोकप्रियतेचा राष्ट्रवादी भविष्यात फायदा घेऊ शकते, अशी चर्चा सुरू आहे. त्यांना नगर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. या कारणावरून आमदार लंके यांच्यावर टीका केली जात असल्याचा त्यांच्या समर्थकांचा आरोप आहे.

खासदार विखे पाटील यांना खरे तर कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवार यांची तर पारनेरमध्ये नीलेश लंके यांची भीती वाटत आहे. त्या भितीपोटीच ते बिनबुडाचे आरोप करीत असल्याचा लंके समर्थकांचा दावा आहे. लंके छोट्याशा कामाचीही प्रसिद्धी करतात. आम्ही ढिगाने काम करतो, तरीही त्याची कुठे वाच्यता करीत नाही, असा टोमणा विखे पाटील यांनी मारला होता.Vikhe Patil deliberately criticizes Nilesh Lanke

मध्यंतरी खासदार विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. आमच्या मतदारसंघात नाक खुपसू नका, असे लंके म्हणाले होते. तेव्हापासून खासदार विखे आणि आमदार नीलेश लंके यांच्यात अनबन आहे.

Edited By - Ashok Nimbalkar

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com