ग्रामस्थ सरसावले वृक्ष लागवडीसाठी, स्वीकारली वृक्ष संवर्धनाची जबाबदारी

रोकडा सावरगाव ग्रामस्थांनी गावात जवळपास एक हजार झाडांचे वृक्षारोपण केलं आहे.
ग्रामस्थ सरसावले वृक्ष लागवडीसाठी, स्वीकारली वृक्ष संवर्धनाची जबाबदारी
ग्रामस्थ सरसावले वृक्ष लागवडीसाठी, स्वीकारली वृक्ष संवर्धनाची जबाबदारीदिपक क्षिरसागर

लातूर: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत (Corona Second Wave) निर्माण झालेल्या ऑक्सिजनच्या (Oxygen) तुटवड्यामुळे अनेकांचे जीव गेले. त्यामुळे आता नैसर्गिक ऑक्सिजन मिळावा म्हणून लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील रोकडा सावरगाव इथे अधिकाधिक ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

रोकडा सावरगाव ग्रामस्थांनी गावात जवळपास एक हजार झाडांचे वृक्षारोपण केलं आहे. वड, पिंपळ, कडूलिंब, करंज अशा देशी ऑक्सिजन देणाऱ्या वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. विशेषबाब गावातील प्रत्येक व्यक्तीने एक झाड दत्तक घेऊन त्यांचे संगोपन करण्याची शपथही घेतली आहे.

याशिवाय पुढच्या वर्षी या झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्पही रोकडा सावरगावच्या ग्रामस्थांनी केलाय. सह्याद्री-देवराई प्रतिष्ठानने यासाठी सर्व वृक्ष पुरविले आहेत. या अनोख्या उपक्रमासाठी अहमदपूरचे तहसीलदार, वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com