Nagar News : कच-याचा प्रश्न पेटला; भाळवणी ग्रामपंचायतीच्या विराेधात ग्रामस्थांचे बेमुदत उपाेषण सुरु

विषारी धुरामुळे हजारो विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
bhalwani grampanchayat, nagar news
bhalwani grampanchayat, nagar newssaam tv

- सुशील थोरात

Nagar News : नगर जिल्ह्यातील भाळवणी ग्रामपंचायतीच्या विरोधात ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. कापरी नदीलगतचा कचरा डेपो हलविण्याच्या प्रमुख मागणीसाठी ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. (Maharashtra News)

bhalwani grampanchayat, nagar news
AAP Swarajya Yatra : कोल्हापूर महापालिका निवडणुकीचे आम आदमी पार्टी फुंकणार रणशिंग; उद्या 'आप'ची स्वराज्य यात्रा काेल्हापूरात

पद्मश्री पोपटराव पवार (popatrao pawar) यांचा फोटो भाळवणी ग्रामपंचायत (bhalwani grampanchayat) कार्यालयातून काढून टाकण्यात आला. या झालेल्या प्रकाराबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाने जाहीर माफी मागावी अशी मागणी देखील ग्रामस्थांनी केली आहे. या आंदाेलनात अशोक रोहोकले, संदीप रोहोकले, पुरुषोत्तम गोडसे आणि अमोल रोहोकले हे सहभागी झाले आहेत. कचरा डेपो न हलविल्यास उपोषणावर ठाम राहण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.

bhalwani grampanchayat, nagar news
Shivrajyabhishek Sohala News | Raigad | रायगडावर 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची जय्यत तयारी सुरु

या आंदाेलनाबाबत (aandolan) अशोक रोहकले म्हणाले शाळेच्या पाठीमागे कापरी नदीच्या किनारी ग्रामपंचायतीमार्फत टाकण्यात येतो. या कचऱ्यामध्ये अनेक प्रकारचा आरोग्यास धोकादायक कचराही असतो.

कचऱ्याचे विघटन होईल अशी कुठलीही व्यवस्था करण्यात आलेली नसून त्याच ठिकाणी हा कचरा जाळण्यात येतो. गावठाणातील वस्तीची ठिकाणे तसेच शाळांपासून कचरा डेपोचे अंतर जवळ असल्याने विषारी धुरामुळे हजारो विद्यार्थी तसेच ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्यामुळे हा कचरा डेपो लवकरात लवकर हटवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे अन्यथा उपोषणावर ठाम राहू असा इशारा देखील देण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com