School : ताेपर्यंत साेडणार नाही ! मुख्याध्यापकासह विस्तार अधिका-यास कोंडलं

सध्या स्थितीत तीनच शिक्षक शाळेत शिकवत असून एक शिक्षक कमी आहे.
malvan , zilla parishad school ,  principal
malvan , zilla parishad school , principalsaam tv

- विनायक वंजारे

Malvan : सिंधुदुर्ग (sindhudurg) जिल्ह्यात एका जिल्हा परिषद शाळेतील (school) मुख्याध्यापकासह विस्तार अधिकारी तसेच केंद्र प्रमुखांना ग्रामस्थांनी काेंडून ठेवलं आहे. जाेपर्यंत गटविकास अधिकारी शाळेत येऊन लेखी उत्तर देत नाहीत ताेपर्यंत अधिका-यांची सुटका करणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी (villagers) घेतला आहे. (Sindhudurg Latest Marathi News)

या घटनेबाबत अधिक माहिती अशी - मालवण येथील हेदुळ जिल्हा परिषद शाळेत मंजूर शिक्षक नसल्यामुळे येथील पालक व ग्रामस्थांनी आंदोलन छेडले. आक्रमक पालकांनी शाळेला टाळे ठोकले आहे. यावेळी येथे उपस्थित असलेले विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि मुख्याध्यापक यांना ग्रामस्थांनी केबीनमध्ये कोंडून ठेवले आहे.

malvan , zilla parishad school ,  principal
Sports : तिच्याशी झटायचा, अश्लील व्हिडीओ पाठवायचा; क्रीडा प्रशिक्षकास अटक

जो पर्यंत गटविकास अधीकारी येऊन लेखी उत्तर देत नाहीत तोपर्यंत अधिका-यांना मुक्त करणार नसल्याचा पवित्रा पालकांनी घेतला आहे. हेदुळ शाळेत एकुण 53 विद्यार्थी पटसंख्या असून चार शिक्षकपदे मंजूर आहेत. मात्र सध्या स्थितीत तीनच शिक्षक शाळेत शिकवत असून एक शिक्षक कमी आहे.

malvan , zilla parishad school ,  principal
Shirdi : शिर्डीच्या साई बाबांचं मंदिर 'या' तारखेस दर्शनास रात्रभर खूलं

त्यामुळे चार शिक्षकांंची गरज आहे. ही गरज असल्याचे यापुर्वी कळविण्यात आले हाेते. त्यामध्ये कमी शिक्षकांमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे असे म्हटले हाेते. वेळोवेळी शिक्षकांची मागणी करूनही गटविकास अधिका-यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप आज ग्रामस्थांनी केला आहे. गटविकास अधिकारी जाेपर्यंत येत नाहीत आणि लेखी उत्तर देत नाहीत ताेपर्यंत अधिका-यांची सुटका केली जाणार नाही असे ग्रामस्थांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

malvan , zilla parishad school ,  principal
Kass : तिढा सुटला; राजेंची मागणी मान्य, कास पठार ई बस 'येथून' धावणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com