औरंगाबाद जवळील नारायणपूर गावकऱ्यांनी घडवले हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन

समाजासमोर ठेवला नवा आदर्श
Aurangabad News in Marathi, Hindu-Muslim unity News
Aurangabad News in Marathi, Hindu-Muslim unity NewsSaam Tv

औरंगाबाद - सध्या देशात एकीकडे हनुमान जन्मभूमी तसेच मंदिर-मस्जिदवरुन ठिकठिकाणी राजकारण सुरू आहे. यामुळे जाती धर्मात तेढ निर्माण होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तोच दुसरीकडे औरंगाबादहून (Aurangabad) 15 ते 20 किमी अंतरावर असलेल्या नारायणपूर (Narayanpur) गावातील मुस्लिमांनी पुढाकार घेऊन 350 वर्षे जुन्या हनुमान मंदिराचे (Hanuman Temple) जिर्णोद्धार करून समाजासमोर एक नवा आदर्श ठेवला आहे. (Aurangabad News in Marathi)

हे देखील पाहा -

3500 लोकसंख्या असलेल्या नारायणपूर गावात 2800 लोकसंख्या मुस्लिमांची आहे तर 400 दलितांचे, 300 गोसावी समाजाची असून गावात 2-3 शीख कुटुंबे देखील वास्तव्यास आहेत. विशेष म्हणजे या गावात एकही हिंदू कुटुंब वास्तव्यास नाही. 350 वर्षे जुने असलेल्या या हनुमान मंदिराची पुर्णपणे पडझड झाल्याने या मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचा निर्णय गावाचे सरपंच नासीर पटेल यांनी घेत गावकरी व मित्र मंडळींच्या सहकार्याने फेब्रुवारी महिन्यात जिर्णोद्धाराचे काम सुरू केले आणि आता त्या मंदिराच्या जिर्णोद्धाराचे काम पूर्ण झाले असून ते मंदिर दर्शनासाठी सुरू करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com