रिफायनरी समर्थनार्थचा ठराव रद्द करा; विलयेकर भूमिकेवर ठाम

opposed for refinery project
opposed for refinery project

रत्नागिरी : राजापूर rajapur तालुक्यातील विलये येथे हाेऊ घातलेला रिफायनरी प्रकल्पास refinery project ग्रामस्थांचा ठाम विराेध आहे. ग्राम सभेत माेठ्या मताधिक्याने या रिफायनरी प्रकल्पास विराेध हाेऊन सुद्धा ग्रामपंचायत सदस्यांनी परस्पर प्रकल्प मान्य असल्याचा ठराव केला आहे असा आराेप करीत संबंधित ठराव रद्द करावा अशी मागणी रिफायनरी प्रकल्प विराेधी संघटनेने निवेदनाद्वारे केली आहे. (villagers-opposed-rajapur-vilay-grampanchayat-refinery-project-sml80)

याबाबतचे निवेदन संघटनेने तहसीलदारांना दिले आहे. या निवेदनात ग्रामस्थांचा रिफायनरीस ठाम विराेध opposed for refinery project असूनही सदस्यांनी मासिक सभेत ठराव केल्याचे म्हटले आहे. यामुळे गावाची दिशाभूल झाली आहे अशी भावना ग्रामस्थांची झाल्याचे रिफायनरी विराेधी संघटना विलयेचे अध्यक्ष समाधान तावडे यांनी नमूद केले.

तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात विलये गावातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीने ग्रामसभेत हाेऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्प समर्थनाचा ठराव १३३ विरुद्ध चार अशा माेठ्या मताधिक्याने अमान्य करण्यात आला. संबंधित हाेऊ घातलेला रिफायनरी प्रकल्प आम्हां ग्रामस्थांना नकाे आहे. हे ग्रामस्थांनी ग्रामसभे वेळीस संपुर्ण सभागृहास निदर्शानस आणून दिले आहे. तरी देखील दहा डिसेंबर २०२० कालावधीत ग्रामपंचायतीच्या मासिक सभेत पुन्हा रिफायनरी समर्थनाचा ठराव मंजूर करण्यात आला.

या मसिक सभेत सदस्यांनी केलेला ठराव हा ग्राम सभा घेवून ग्रामस्थांच्या समाेर मांडणे आवश्यक हाेते. ग्रामस्थांची मते पुन्हा एकदा जाणून घ्यायला हवी हाेती. तसे न करता परस्पर सदस्यांनी मासिक सभा घेवून रिफायनरी प्रकल्प समर्थनाचा ठराव मंजूर केला. या ठरावास बहुसंख्य ग्रामस्थांचा विराेध आहे.

ग्रामपंचायत सदस्यांनी मासिक सभेत केलेल्या ठराव तहसिल कार्यालय व माध्यमांना १३ जूलै २०२१ कालावधीत दिला. यामुळे गावात संभ्रम निर्माण झालेला आहे. हा ठराव रद्द करावा असे आदेश तहसिल कार्यालयाने विलये ग्रामपंचायतीस द्यावेत अशी मागणी ग्रामस्थांची आहे.

opposed for refinery project
उध्दव ठाकरेंचा शिवशाही नव्हे तर सुलतानी कारभार; व्यापा-यांचा आराेप

ग्रामस्थ पुन्हा एकदा हाेऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या विराेधात ठाम असून पुढील ग्रामसभेत ठराव मंजूर करु. यापुर्वी सर्मथनाचा जाे ठराव ग्रामपंचायत सदस्यांनी दिलेला आहे ताे रद्द करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

रिफायनरी विराेधी संघटना विलयेचे अध्यक्ष समाधान तावडे यांच्यासह सुशांत तावडे, दत्ताराम यादव, जयदास म्हाडगुत, संताेष कदम, नंदकिशाेर साळसकर, दशरथ गुरव, सुहास तावडे आदी उपस्थित हाेते.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com