Beed, mahavitran, farmers
Beed, mahavitran, farmerssaam tv

Beed News : महावितरणच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी राेखला पाटोदा - लातूर महामार्ग

यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतक-यांनी दिला आहे.

Mahavitran : कोणतीही कल्पना, नोटीस न देता महावितरणकडून बीड जिल्ह्यात कृषी पंपाचे वीज कनेक्शन ताेडण्याचा धडाका सुरू आहे. या विरोधात आता शेतकरी आक्रमक झाले आहेत. बीडच्या लिंबागणेश येथे पाटोदा - लातूर महामार्ग आडवत सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली, शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केलं.

बीड जिल्ह्य़ात झालेल्या अतिवृष्टीत खरीपातील सोयाबीन, कापूस आदी पिके हातची गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे ऐन रब्बी हंगामात ज्वारी, गहु, हरबरा पिकांना पाणी देण्याची आवश्यकता असतानाच महावितरणकडुन थकीत विजबील वसुलीच्या नावाखाली कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे.

Beed, mahavitran, farmers
Balasaheb Thackeray Smrutidin : ते काेत्या मनाचे ! शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरे गटावर हल्लाबाेल

अगोदरचं अस्मानी संकटात असताना आता पुन्हा सुलतानी संकट महावितरणने (mahavitran) निर्माण केलंय. त्यामुळं शेतक-यांना वेठीस धरणाऱ्या महावितरणच्या धोरणाच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली लिंबागणेश येथे पंचक्रोशीतील शेतक-यांनी पाटोदा- लातूर राष्ट्रीय महामार्ग अडवत "चक्काजाम आंदोलन केले.

Beed, mahavitran, farmers
Trains Cancelled : तपोवन एक्सप्रेससह मुंबईला जाणा-या १२ ट्रेन रद्द

दरम्यान शेतकऱ्यांचे (farmers) तोडलेले कनेक्शन परत जोडा आणि यानंतर कृषी पंपाचे वीज कनेक्शन तोडू नयेत. अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Beed, mahavitran, farmers
Pandharpur Corridor : एकच जिद्द कॉरिडॉर रद्द; पंढरपूरात महामाेर्चा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com