सिंधुदुर्गवासियांना खऱ्या अर्थाने बाप्पा पावला : विनायक राऊत

uddhav thackeray vinayak raut
uddhav thackeray vinayak raut

सिंधुदुर्ग : चिपी विमानतळानंतर आता वैद्यकीय महाविद्यालयाचे स्वप्न पूर्ण होणार आहे. सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयाला एन. एम. सी. ने अखेर मान्यता दिली आहे. या शैक्षणिक वर्षापासून एमबीबीएस डॉक्टरांचे पहिला वर्ग सुरू होईल अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी आज (मंगळवार) येथे दिली. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thackeray vinayak raut यांना धन्यवाद देतो की त्यांनी दिलेला शब्द पाळला असून गणपती बाप्पा पावला असल्याचेही खासदार विनायक राऊत यांनी म्हटलं आहे. vinayak-raut-addressed-media-on-chipi-airport-uddhav-thackeray-kokan-news-sml80

uddhav thackeray vinayak raut
उदय सामंत म्हणजे कोकणातले शक्ती कपूर, सचिन वाझेंचे भाऊ : राणे

गेली पंचवीस-तीस वर्षे सिंधुदुर्ग जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतीक्षेत होता. काहींनी लोकांसाठी नाही तर स्वतः साठी हे विद्यालय मंजूर करून घेतले आहे अशी टिप्पणी खासदार राऊत यांनी केली. परंतु सिंधुदुर्गवासियांची प्रतीक्षा आता संपली असल्याचे त्यांनी नमूद केले.

सिंधुदुर्गवासियांना खऱ्या अर्थाने बाप्पा पावला आहे अशी प्रतिक्रिया आज माध्यमांशी बोलताना खासदार विनायक राऊत यांनी नमूद केले. ते म्हणाले आगामी काळात लवकरच महाविद्यालयातील शैक्षणिक सत्र हाेईल.

edited by : siddharth latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com