Vinayak Raut News : नारायण राणेंच्या गुंडांना सत्तेचा माज, पाेलिसांनी बंदाेबस्त करावा अन्यथा...

खासदार विनायक राऊत यांनी आज एसपींची भेट घेतली.
Vinayak Raut, Vaibhav Naik, Narayan Rane
Vinayak Raut, Vaibhav Naik, Narayan Ranesaam tv

- विनायक वंजारे

Narayan Rane News : नारायण राणे (Narayan Rane) पुरस्कृत गुंडांना सत्तेचा माज आलेला आहे. निरपराध लोकांवर अन्याय करायचा हा प्रकार तातडीने थांबला पाहिजे. या गुंडगिरीचा समूळ नायनाट करण्याची मागणी जिल्हा पोलिस (police) अधिक्षकांकडे केली असल्याची माहिती खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी कनेडी गावातील मारामारीच्या प्रकारावरुन केल्याचे सांगितले.

Vinayak Raut, Vaibhav Naik, Narayan Rane
Kankavli News : कनेडी राड्याप्रकरणी भाजप - सेना पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

कणकवली येथील कनेडी गावात मंगळवारी भाजप (BJP) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटात तुफान मारामारी झाली हाेती. या मारामारीत शिवसेनेचे (Shivsena) कुंभवडे गावचे सरपंच आप्पा तावडे हे जखमी झाले. तसेच भाजपचे नेते गाेट्या सावंत यांनी देखील मारहण झाली हाेती. दाेन्ही गटाच्या तक्रारीनंतर पाेलिसांनी सुमारे तीस जणांवर गुन्हा दाखल केला.

आज सिंधुदुर्ग येथे विनायक राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना नारायण राणेंच्या पुरस्कृत गुंडाना सत्तेचा माज आला आहे असे म्हटलं. राऊत म्हणाले या जिल्ह्यात जी काही गुंडगिरी चालते, निरपराध लोकांना ठार मारायच, त्यांच्यावर अन्याय करायचा या गुंडगिरीचा समूळ नायनाट करण्याची मागणी आम्ही जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.

Vinayak Raut, Vaibhav Naik, Narayan Rane
Narayan Rane News : नारायण राणे फक्त कुंकवाला धनी, बाकी त्यांचा काही उपयोग नाही : विनायक राऊत

वैभव नाईकांच्या केसाला धक्का लावण्याची धमक नाही

वैभव नाईक यांना शाखेतून बाहेर काढा म्हणणाऱ्यांच्या बाप जाद्यांनाही कधी शक्य होणार नाही, वैभव नाईक यांच्या केसालाही हात लावण्याचा असा टाेला देखील राऊतांनी लगावला. यापुढे कणकवलीत नारायण राणे पुरस्कृत गुंडांची दहशत चालूच राहिली आणि पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त केला नाही तर शिवसैनिकांना त्यांचा बंदोबस्त करावा लागेल असा थेट इशाराच विनायक राऊतांनी दिला. (Breaking Marathi News)

अट्टल गुन्हेगारांवर वचक बसवा

कणकवलीतील कनेडी गावात झालेल्या राड्या प्रकरणी पोलीसांनी काही प्रमाणात परिस्थिती चांगली हातळली असे राऊत यांनी नमूद केले. तरी शिवसेना कार्यालयात घुसणा-या भाजपच्या गुंडाना रोखण्यामधे पोलीस कमी पडले अशी भावना व्यक्त करत राऊत म्हणाले ही बाब आम्ही पोलीस अधीक्षकांना भेटून सांगितली. मात्र हल्ल्यात जखमी झालेल्या आप्पा तावडे यांनी जो जबाब दिलाय त्याची दखल घेऊन पोलीसांनी एफआयआरमधे सुधारणा करून अट्टल गुन्हेगारांना कायद्याच्या कचाट्यात आणावे अशी मागणी केल्याचे राऊतांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com