
रत्नागिरी : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना माझ्या मध्यस्थिमुळे विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्याचा आज मला पश्चाताप होत. माझ्या आयुष्यातील हे मोठ पाप झाले आहे. मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांना सांगितलं नसतं तर एकनाथ शिंदेंना आमदारकी मिळाली नसती असा त्याकाळी घडलेला किस्सा आज (बुधवार) खासदार विनायक राऊत यांनी माध्यमांशी बाेलताना सांगितला. दरम्यान एकनाथ शिंदेंनी ही बाब त्यांच्या आई वडीलांची शपथ घेऊन सांगावी असेही खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी नमूद केले. खासदार राऊत हे रत्नागिरीत (ratnagiri) माध्यमांशी बाेलत हाेते. (eknath shinde latest marathi news)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निषाणा साधला आहे. रिक्षाच्या स्पीड पेक्षा मर्सिडीजचा स्पीड फिका पडला असे त्यांनी लिहिल्याचे खासदार विनायक राऊत यांना माध्यमांनी सांगितलं. त्यावर राऊत म्हणाले एकनाथ शिंदे यांची विद्वत्तेबद्दल संशोधन करावं लागेल. कुणीतरी लिहून देतं म्हणून ते ट्विट करतात. स्वतः कधी ट्विट करतात हा अभ्यास करावा लागेल.
एकनाथरावांनी आई वडीलांची शपथ घ्यावी
माझ्यामुळे ते आमदार झाले असेही खासदार राऊत यांनी म्हटलं. ते म्हणाले एकनाथ शिंदे सभागृह नेते हाेते. मी संपर्कप्रमुख हाेता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सतीश प्रधान यांना गुलाल लावला आणि त्यास एबी अर्ज दिला. त्यावेळी मी बाळासाहेब यांना एक तरुण आहे. त्यास उमेदवारी द्यावी अशी विनंती केली. त्यानंतर बाळासाहेबांनी एकनाथ शिंदेंना उमेदवारी दिली. ही गाेष्ट खरी आहे का नाही ते आता एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या आई वडीलांची शपथ घेऊन सांगावे असेही नमूद केले.
माताेश्रीचे दरवाजे सर्वांसाठी उघडे
राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी भाजप पुरस्कृत उमेदवाराला पाठींबा द्यावा असे पत्र राहूल शेवाळे यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले आहे. या पत्रामुळे पुन्हा एकदा राजकीय वादळ उठले आहे. यावर खासदार राऊत म्हणाले लेखी पत्र देण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटूनही सांगता आलं असतं. त्यांचे दरवाजे उघडे होते.
शंभूराज देसाईंवर टीका
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात तक्रार होती तर तुम्ही केव्हाही मुख्यमंत्री यांच्याकडे बोलायला पाहिजे होतं. केलेल्या गद्दारीच खापर शंभूराज देसाई (shambhuraj desai) हे कोणावर तरी फोडायचं होत म्हणून असे आरोप करायचे हे चुकीचे आहे असेही राऊत यांनी नमूद केले. आता तुम्हांला अक्कल दाढ सुटते त्यावेळी का गेला नाही उद्धव ठाकरेंकडे असेही राऊत यांनी म्हटले.
उद्धव ठाकरे मोठ्या मनाचा नेता
शिवसेनेचे 40 आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. आता खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 18 पैकी 12 खासदार एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. 22 माजी आमदार देखील संपर्कात असल्याचं गुलाबराव पाटील यांनी म्हटलंय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मी तुमच्या कोणावर जबरदस्ती करणार नाही. जे मनापासून माझ्याबरोबर आहेत त्यांनी माझ्यासोबत राहा तुमचं दुसरीकडे भविष्य उज्वल असेल तर जरूर जा असे म्हटलं आहे. एवढ्या मोठ्या मनाचा नेता आम्हांला लाभला यातच आम्हांला समाधान असल्याचे राऊत यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.