Girish Bapat News : 'ब्राह्मणांच्या मतासाठी गिरीश बापटांच्या जीवाशी खेळ'

कसबा पाेटनिवडणुकीचा प्रचार विविध पक्षांकडून मतदारसंघात सुरु आहे.
girish bapat, vinayak raut, kasba bye election, pune
girish bapat, vinayak raut, kasba bye election, punesaam tv

- विनायक वंजारे

Girish Bapat Latest Updates : भाजपला कसबा विधानसभा पोटनिवडणुकीचा (Kasba By-Election) निकाल लक्षात आल्यानेच प्रचारासाठी खासदार गिरीश बापट (girish bapat) यांना मैदानात उतरवलं आहे. खरंतर पंतप्रधान (pm modi) असाे अथवा गृहमंत्री (amit shah) किंवा अन्य भाजपचा माेठा नेता काेणीही निवडणुकीच्या प्रचारासाठी आलं तरी भाजपचा (bjp) पराभव निश्चित आहे असा विश्वास खासदार विनायक राऊत (vinayak raut) यांनी व्यक्त केला.

girish bapat, vinayak raut, kasba bye election, pune
Shiv Jayanti : शिवप्रेमींनाे ! शिवजयंतीला किल्ले शिवनेरीला जाणार आहात ? मग हे वाचाच

खासदार विनायक राऊत म्हणाले पुणे येथील कसबा पोटनिवडणुकीत फक्त ब्राह्मणांची मते मिळवण्यासाठी दुर्धर आजारात ऑक्सीजनवर असलेल्या खासदार गिरीश बापटांना मैदानात उतरवलं जातं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने कमकुवतपणाचे लक्षण आहे. पंतप्रधान, गृहमंत्री पुण्याला येऊन सुद्धा मत मिळणार नाही ही खात्री पटल्यामुळेच गिरीश बापटांना भाजपाने मैदानात आणलं.

girish bapat, vinayak raut, kasba bye election, pune
Prateek Jayant Patil : प्रतीक जयंत पाटील यांच्यासाठी आजचा दिवस ठरणार महत्त्वपूर्ण; जाणून घ्या कारण

खासदार विनायक राऊत म्हणाले हे दुर्देवी आहे. ज्यांना ऑक्सिजनची गरज लागत आहे. दुर्धर आजाराशी ते लढा देताहेत. तरी त्यांना निवडणुकीच्या मैदानात आणलं जात आहे. हे ब्राह्मणांची मत मिळविण्यासाठी केले गेले असेही राऊत यांनी नमूद केले. (Maharashtra News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com