जालन्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, तलवारीने भोकसल्याने तरुण गंभीर जखमी

हाणामारीच्या घटनेनंतर एका टोळक्याने परिसरात हुल्लडबाजी करून सराफा बाजारात, दूध मार्केट परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला दरम्यान या भागासह टांगा स्टँड परीसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.
जालन्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, तलवार भोकसल्याने तरुण गंभीर जखमी
जालन्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, तलवार भोकसल्याने तरुण गंभीर जखमीलक्ष्मण सोळुंखे

जालना : जालन्यातील टांगा स्टँड परीसरात दोन गटात तुंबळ हाणामारी झाली आहे. या हाणामारीत एका गटाने दुसऱ्या गटातील एका व्यक्तीला तलवारीने भोकसल्याने एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावरती सामान्य रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत.

जालन्यात दोन गटात तुंबळ हाणामारी, तलवार भोकसल्याने तरुण गंभीर जखमी
पुढील सुनावणीपर्यंत नितेश राणेंना अटक न करण्याची राज्य सरकारची ग्वाही

हाणामारीच्या घटनेनंतर एका टोळक्याने परीसरात हुल्लडबाजी करून सराफा बाजारात, दूध मार्केट परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला दरम्यान या भागासह टांगा स्टँड परीसरात तणावपूर्ण शांतता असून या भागातील व्यापाऱ्यांनी (Merchants) आपापली दुकानं बंद केली आहे. आज सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे.

हे देखील पहा -

सदर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन टांगा स्टँड परिसरात कोणताही अनुचिच प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त वाढवला आहे. दरम्यान सध्या या भागात पोलिसांचा बंदोबस्त कायम असून परीसरात तणावपूर्ण शांतता कायम आहेत तर व्यापाऱ्यांनी बंद केलेली दुकानं देखील उघडण्यात येत आहेत.

Edited By - Jagdish Patil

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com