Viral Video: वाढदिवसाचा अतिरेक, NCP नेत्याची जेसीबीच्या खोऱ्यावर चढून चमकोगिरी

वाढदिवसाचा अतिरेक करणारे विजयसिंह पंडित हे NCP चे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय आहेत. तर माजी आमदार अमरसिंह पंडित यांचे ते बंधू आहेत.
Viral Video: वाढदिवसाचा अतिरेक, NCP नेत्याची जेसीबीच्या खोऱ्यावर चढून चमकोगिरी
Viral Video: वाढदिवसाचा अतिरेक, NCP नेत्याची जेसीबीच्या खोऱ्यावर चढून चमकोगिरीविनोद जिरे

बीड: राष्ट्रवादीच्या नेत्याचा वाढदिवसानिमित्त (BirthDay) सत्कार घेण्यासाठी जीवघेणा स्टंट समोर आला आहे. अति उत्साहात नेत्याने कार्यकर्त्यांचा देखील जीव धोक्यात घातल्याचे व्हायरल व्हिडिओ मध्ये दिसून येत होते. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय व राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित (Vijaysinh Pandit Beed) यांचा वाढदिवस काल बीडच्या गेवराईत साजरा करण्यात आलाय. विजयसिंह पंडित यांचे 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकीची निवडणूक लढवली होती. (Viral Video: Birthday Excess, NCP Leader Vijaysinh Pandit Shines on JCB Valley )

हे देखील पहा -

तर आता त्यांचा हा वाढदिवस चांगलाच चर्चेत आला आहे. त्याचे कारण म्हणजे विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी, जवळपास 700 किलो वजनाचा हार आणण्यात आला होता. यात धक्कादायक बाब म्हणजे एकाच जेसीबी वर अनेक कार्यकर्त्यांसह स्वतः विजयसिंह पंडित जवळपास 15 फूट उंचावर चढून त्यांनी या शुभेच्छा स्वीकारल्या आहेत. मात्र एक जबाबदार व्यक्ती असताना, त्यांना याचं भान राहिलं नसल्याचे या व्हिडीओतून स्पष्ट दिसत आहे. स्वतःच्या जीवा बरोबरच त्यांनी इतरांचा जीव देखील धोक्यात टाकल्याचे स्पष्ट दिसत आहे.

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होतोय. यामुळे वाढदिवस साजरा करताना दुसऱ्याचा जीव धोक्यात घालण्यास जबाबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात विजयराजे पंडित यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com