Viral Video: मालक दुकानात गेला, संधी साधून बाईकवरुनच बाईक नेली; नेमकं काय घडलं?

छत्रपती संभाजीनगर बाईकलाच डबल सीट घेतल्याचा प्रकार समोर आला आहे.
Viral Video
Viral Video Saam TV

नवनीत तापडिया

छत्रपती संभाजीनगर : बाईकवर तुम्ही ट्रिपल सीट किंवा त्याहून अधिक जण प्रवास करताना पाहिले असतील. असे व्हिडीओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. मात्र छत्रपती संभाजीनगर बाईकलाच डबल सीट घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. (Viral Video)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील हा व्हिडीओ आहे. एका फायनान्स कंपनीने ही पैसे थकल्याने हा बाईक जप्त केली आहे. मात्र फायनान्स कंपनीने बाईकवर ही बाईक उचलून नेली. त्यामुळे गाडी जप्त करण्याची आणि ती नेण्याच्या धोकादायक पद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, बाईकच्या मालकाने काही ईएमआय थकवले होते.दुचाकीचा मालक जवळील दुकानामध्ये काही कामानिमित्त गेला होता. हीच संधी साधत फायनान्स कंपनीसाठी वसुली करणाऱ्यांनी चक्क बाईक दुसऱ्या बाईकवर ठेवून जप्त करुन नेली. या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com