'बीड का कोई दादा तुमको बचा नहीं सकता, एसपी भी नही"; Viral Video प्रकरणाने खळबळ

खंडणीखोरांची शिव्यांची लाखोळी, पोलिसांना खुले आव्हान...
Beed
Beedविनोद जिरे

विनोद जिरे

बीड: शहरात तलवार, लाकडी दांड्याने अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये "बीड का कोई दादा तुमको बचा नही सकता, एसपी भी नही" असं म्हणत शिव्यांची लाखोळी वहात पोलिसांना खुले आव्हान दिले आहे..या व्हायरल व्हिडिओ प्रकरणाने खळबळ उडाली असुन बीडमध्ये कायद्याचा धाक राहिलाय की नाही ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

बीड शहरातील तंबाखू चोरीच्या संशयावरून, पिस्तुलाचा धाक दाखवत 20 लाख रुपयांच्या खंडणीसाठी पाच जणांवर शस्त्राने हल्ला चढविल्याची घटना शहराजवळील गोरे वस्तीवर घडली होती. याप्रकरणी बीड ग्रामीण ठाण्यात 6 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आलाय. मात्र, आरोपी फरार आहेत. 17 मे रोजी रात्री साडेबारा वाजता गोरे वस्तीवरील एका शेडवर बोलावून तलवार, लाकडी दांड्याने मारहाण करण्यात आलीय. यावेळी पिस्तुलाच्या धाकावर तंबाखू परत करा...अन्यथा 20 लाख रुपये द्या , असे म्हणत खंडणी मागितली आहे. मारहाणीत 5 जण गंभीर जखमी झाले .

Beed
सावधान! मोबाईलचा अतिवापर केल्यास अल्झायमर्सचा धोका...

तर या घटनास्थळाचे 2 व्हिडिओ समाजमाध्यमावर व्हायरल झाले असून , एका व्हिडिओत "बीड का कोई दादा तुमको बचा नहीं सकता , एसपी भी नही" ... असे म्हणत शिव्यांची लाखोळी वाहून पोलिसांना खुले आव्हान दिल्याचे दिसत आहे. शेख मोसीन याच्या फिर्यादीवरुन शेख इर्शाद शेख अब्दुल रज्जाक शेख, शेख सादेक शेख अब्दुल रज्जाक शेख, शेख वसीम शेख अब्दुल रज्जाक शेख, शेख अस्लम शेख अब्दुल रज्जाक शेख, शेख अमन शेख इर्शाद शेख सर्व रा.बालेपीर, बीड व शेख वसीम शेख अब्दुल रज्जाक याचा भाचा यांच्यावर बीड ग्रामीण ठाण्यात खंडणी, खुनाचा प्रयत्न, शस्त्रास्त्र कायद्यान्वये गुन्हा नोंद झाला आहे.

हे देखील पाहा-

दरम्यान, एक मिनिट 30 सेकंदांच्या व्हिडिओत "तुमने हमको पहेचाना ही है , हम कौन है ... बीड का कोई दादा तुमको बचा नहीं सकता , एसपी भी नही ... असे म्हणत अर्वाच्य शिव्या दिल्या आहेत. दरम्यान , या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली असून बीड जिल्ह्यात कायद्याचा धाक उरला आहे की नाही ? असाचं प्रश्न यावरून उपस्थित केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com