Viral Video : चहा पिणारा मुंगूस पहिला आहे का ? व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

मुंगूसचा चहा पितानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
Pandharpur Viral Video News
Pandharpur Viral Video Newssaam tv

Pandharpur Viral Video News : आपल्या देशातील नागरिक चहाचा आस्वाद नेहमी आनंदाने घेताना दिसतात. अनेकांची सकाळ ही चहा (Tea) प्यायल्यानंतरच सुरू होते. अनेक कर्मचारी कार्यलयातून वेळ काढून चहा पिण्यासाठी टपरीवर जात असतात. त्यामुळे चहाच्या टपरीवर नेहमी माणसांची वर्दळ दिसते. अशाच पंढरपुरातील (Pandharpur) एका वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या चहाच्या टपरीवर माणसांसोबत एक मुंगूसही दररोज सकाळी चहा प्यायला येतं. विश्वास बसत नाही ना... परंतु हे खरे आहे. या मुंगूसचा चहा पितानाचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Pandharpur Viral Video News
Funny Video : 'पापा की परी पाणी मे जा गिरी'; पाण्यात उड्या मारणं तरुणीच्या अंगलट

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपुरातील सचिन देशमाने यांची इसबावी परिसरात चहाची टपरी आहे. येथे दररोज चहा पिण्यासाठी माणसांची वर्दळ असते. अशा वर्दळीच्या ठिकाणी एक मुंगूस नियमीत न घाबरता चहाचा आस्वाद घ्यायला येते. गेल्या सहा महिन्यांपासून हे मुंगूस चहाचा आस्वाद घेत आहे. तेही दररोज नियमित ठरलेल्या वेळेत हे मुंगूस चहा पिण्यासाठी हजर असते. सकाळी नऊ ते दहा या वेळेत न चुकता हे मुंगूस चहा प्यायला येते.

टपरी मालक सचिन देखील त्याला न चुकता एका भांड्यात चहा ठेवतात. चहाचा आस्वाद घेतल्यानंतर मुंगूस परत ऐटीत जाते. मुंगूसाचा चहा पिण्याचा दिनक्रम पाहण्यासाठी परिसरातील लोक आवर्जून सचिनच्या चहाच्या टपरीवर येतात. मुंगूस चहाचा आस्वाद घेत असल्याने या मुंगूसाची व चहाच्या टपरीची चांगलीच चर्चा पंढरपूरमध्ये रंगली आहे.

Pandharpur Viral Video News
Dhule: राष्ट्रीय कौंटुंबिक आरोग्य अहवाल विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

मुंगूसाचा चहाचा आस्वाद घेतानाचा क्षण कैमऱ्यात कैद करण्यात आला आहे. मुंगूस चहाचा आस्वाद घेतानाचा क्षण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांचा कमेंट्स आणि लाईक्स वर्षाव पडत आहे. मुंगूसाचा चहा पितानाचा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच पसंत पडला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com