Virar : ड्रममध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघडकीस!

विरारच्या उसगाव येथे, रस्त्याच्या कडेला एका ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा हत्या केलेला मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये आढळून आला.
Virar : ड्रममध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघडकीस!
Virar : ड्रममध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघडकीस!चेतन इंगळे

वसई /विरार : विरारच्या मांडवी पोलीस ठाणे हद्दीतील उसगाव येथे, रस्त्याच्या कडेला एका ३० ते ३५ वयोगटातील अज्ञात व्यक्तीचा हत्या केलेला मृतदेह पाण्याच्या ड्रम मध्ये फेकून दिलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने ही घटना उघडकीस आली व त्यांनी याबतची माहिती पोलिसांना दिली.

हे देखील पहा :

पोलिसांनी घटनास्थळी पोहचत तपासणी केली असता सदर मृतदेह कपड्याने गुंडाळलेल्या अवस्थेत ड्रम मध्ये टाकून रस्त्याकडेला फेकल्याचे दिसून आले. सदर व्यक्तीची गळा दाबून हत्या केल्याचा संशय व्यक्त होत असून पुरावा नष्ट करण्याचा हेतूने रात्रीच्या अंधारात रस्त्याकडेला फेकला.

Virar : ड्रममध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघडकीस!
महिला पोलिसाने हात धुण्यासाठी खिडकीबाहेर काढला अन् साप चावला!
Virar : ड्रममध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघडकीस!
विरार मध्ये तरुणावर चॉपर ने हल्ला, घटना CCTV मध्ये कैद; पहा Video
Virar : ड्रममध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघडकीस!
नाशिकमध्ये सापडला रहस्यमय भुयारी मार्ग! पहा Video
Virar : ड्रममध्ये आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; दुर्गंधीमुळे घटना उघडकीस!
देहव्यापारासाठी गुजरातला जाणाऱ्या १० महिलांना नागपूर पोलिसांकडून अटक!

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पुढील तपासासाठी पाठवून दिला आहे. सदर मृतदेहाची अद्याप ओळख पटली नसल्याने विरार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास केला जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.