नांदेडच्या सिईओ यांची शाळेला अचानक भेट; ५ शिक्षक निलंबित!

नांदेड जिल्ह्य़ातील भोकर येथील जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क नुतन शाळेस, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिली. पाहणी दरम्यान अनुपस्थित 5 शिक्षकांना त्‍यांनी तडकाफडकी निलंबीत केले.
नांदेडच्या सिईओ यांची शाळेला अचानक भेट; ५ शिक्षक निलंबित!
नांदेडच्या सिईओ यांची शाळेला अचानक भेट; ५ शिक्षक निलंबित !संतोष जोशी

नांदेड - नांदेड जिल्ह्य़ातील भोकर येथील जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क नुतन शाळेस शुक्रवारी ता.16 रोजी जिल्‍हा परिषदेच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देऊन शाळेची पाहणी केली. यावेळी अनुपस्थित असलेल्‍या 5 शिक्षकांना त्‍यांनी तडकाफडकी निलंबीत केले. Visit to ZP school by CEO of Nanded 5 teachers suspended

कोरोना पार्श्‍वभूमीवर शिक्षकांना शाळेत 50 टक्‍के उपस्थिती अनिवार्य आहे. 50 टक्‍के प्रमाणे आज 19 शिक्षक उपस्थित राहणे आवश्‍यक होते. परंतु शाळा भेटी दरम्‍यान 5 शिक्षक अनुस्थित आढळून आल्‍यामुळे निलंबनाची कार्यवाही करण्‍यात आली आहे. तर एका शिक्षकास कारणे दाखवा नोटीस देण्‍यात आली. जिल्‍हा परिषदेच्‍या केंद्रीय प्राथमि‍क शाळेस वर्षा ठाकूर यांनी भेट देऊन ही कार्यवाही केली आहे.

हे देखील पहा -

नियमानुसार शिक्षक शाळेत उपस्थित राहणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्‍यांचा अभ्‍यास पूर्ण करण्‍यासाठी ऑनलाईन प्रणालीव्‍दारे तसेच शिक्षक मित्र उपक्रमातून प्रत्‍येक विद्यार्थ्‍यांपर्यंत शिक्षण पोहोचणे आवश्‍यक आहे. याचे सर्व नियोजन शाळास्‍तरावर उपस्थित राहून शिक्षकांनी करणे आवश्‍यक आहे. परंतु येथील शाळेत शिक्षक अनुपस्थित असल्‍याने वर्षा ठाकूर यांनी चांगलेच खडसावले.

शैक्षणिक गुणवत्‍ता वाढ अभिनांतर्गत मुलांची इंग्रजी व गणित विषयाची चांगली तयारी करुन घेण्‍यासाठी प्रयत्‍न करावेत. तसेच नव-नवे उपक्रम राबवण्‍याची आवश्‍यकता आहे. माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळेत वृक्ष लागवड, डिजीटल शाळा, रंगरंगोटी व सुशोभिकरण करण्‍यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. यावेळी त्‍यांनी पालक व विद्यार्थ्‍यांशी संवाद साधला. दरम्‍यान जिल्‍हा परिषद हायस्‍कुल भोकर, बारड व शेंबोली येथे शाळांना भेटी दिल्‍या. तसेच बारड ग्राम पंचायत व शेंबोली येथील आरोग्‍य उपक्रेंद्रास त्‍यांनी भेट देवून संवाद साधला.

नांदेडच्या सिईओ यांची शाळेला अचानक भेट; ५ शिक्षक निलंबित !
नांदेडमध्ये काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा; संयोजकांवर गुन्हा दाखल

बारड येथील शाळेतील विद्यार्थांनी नावीन्यपूर्ण उपक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी ऑनलाइन शिक्षण, सेतू अभ्यासक्रमाविषयी मुख्याध्यापिका श्रीमती तळणकर यांनी माहिती दिली. वर्षा ठाकूर यांनी शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छ शाळा सुंदर शाळा करणे, बाला अंतर्गत शाळेची रंगरंगोटी, एस्ट्रॉनॉमी, खगोलशास्त्र, भाषाविषयक जाणिवा वाढवणे, बोलक्या भिंती, रोपवाटिका, नर्सरी तयार करणे आदी बाबतीत सूचना केल्या.

वस्ती शेंबोली येथील शाळेस त्यांनी भेट दिली. रूपाली कांबळे, कोमल लोमटे यांनी शाळेतील उपक्रमांची माहिती दिली. ओम नावाच्या विद्यार्थ्याला आई बाबा नाहीत. हा विद्यार्थी आजीकडे राहून शिक्षण घेतो. त्यासाठी आवश्यक सर्व मदत करणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी सांगितले.

Edited By : Krushnarav Sathe

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com