Kartiki Ekadashi: विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लवकरच नुतनीकरण केले जाईल; उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

"श्री विठ्ठल मंदिराचे पुरातन रूप जपण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही"
Kartiki Ekadashi
Kartiki EkadashiSaam Tv

पंढरपूर - आज कार्तिकी एकादशी आहे. कार्तिकी एकादशी निमित्ताने पंढरपुरात (Pandharpur) भक्तीचा महापूर आला आहे. चंद्रभागा स्नानासाठी भाविकांची एकच झुंबड उडाली आहे. पंढरपुरात हरी नामाचा जयघोष सुरू असून अवघी पंढरी हरिनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. विठ्ठल मंदिरावर आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे लवकरच नुतनीकरण केले जाईल असे आश्वासन दिले आहे.

Kartiki Ekadashi
Kartiki Ekadashi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

ते म्हणाले की, पंढरपूर कॉरिडॉर करताना सर्वांना विश्वासात घेऊन केला जाईल. सोबतच श्री विठ्ठल मंदिराचे पुरातन रूप जपण्यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. लवकरच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि संत नामदेव पायरीचे नुतनीकरण केले जाईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

पंढरपूर कॉरिडॉर करताना कोणतेही पाड काम करणार नाही. गरज पडली तर त्याला योग्य मोबदला दिला जाईल. स्थानिक नागरिक, भाविकांना विश्वासात घेऊन पंढरपूर विकास आराखडा तयार केला जाईल. मुख्यमंत्री असताना 4 वेळा आणि कार्तिकीचीही महापूजा करण्याचे भाग्य लाभले हा विलक्षण योग असल्याचे फडणवीस म्हणाले.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे पुरातन रूप जपण्यासाठी शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही असे आश्वासन त्यांनी दिले. मंदिर नुतनीकरणाचे काम लवकर हाती घेण्याच्या सूचना ही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

शासकीय महापूजा संपन्न

कार्तीकी एकादशी निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्या हस्ते आज पहाटे संपन्न झाली. यावेळी मानाचा वारकरी होण्याचा मान औरंगाबाद जिल्ह्यातील उत्तमराव साळुंखे आणि त्यांच्या पत्नी कलावती साळुंखे यांना मिळाला आहे. 

Edited By - Shivani Tichkule

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com