सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मतदानाला सुरुवात; मविआ भाजपामध्ये काट्याची लढत

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी आज मतदान पार पडत आहे. 18 जागांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपामध्ये काट्याची लढत होत आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मतदानाला सुरुवात; मविआ भाजपामध्ये काट्याची लढत
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकSaamTvNews

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूकीसाठी आज मतदान पार पडत आहे. 18 जागांसाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजपामध्ये काट्याची लढत होत आहे. जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 18 जागांसाठी 46 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

हे देखील पहा :

12 केंद्रांवर  मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून 2 हजार 576 मतदार आहेत...त्यापैकी 2 हजार 219 संस्था सभासद असून, 354 हे वैयक्तिक मतदार आहेत. सकाळी 8 वाजल्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. तर महाविकास आघाडी प्रणीत सहकार विकास पॅनेलचे तीन उमेदवार आधीच बिनविरोध निवडून आले आहेत.

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक
कितीही काळी मांजरे, कोल्हे आणि लांडगे आले तरीही वाघासमोर काही चालत नाही: संजय राऊत

त्यामुळे 18 जागांसाठी निवडणूक होत असली तरी भाजप प्रणीत शेतकरी विकास पॅनेलने 16 जागांसाठी उमेदवार उभे केले आहेत. तर, दोन जागावर अपक्ष मैदानात उतरले आहेत. अत्यंत चुरशीने या निवडणुकीचा प्रचार झाला असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.