नंदुरबार-धुळे संयुक्त DCC बँकेच्या १० जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत

भाजपाचे प्राबल्य असलेल्या या बँकेवर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलच्या माध्यमातुन विरोधी गट रिंगणात उतरला आहे.
नंदुरबार-धुळे संयुक्त DCC बँकेच्या १० जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत
नंदुरबार-धुळे संयुक्त DCC बँकेच्या १० जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरळीतSaamTvNews

नंदुरबार : नंदुरबार-धुळे संयुक्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १० जागांसाठी होत असलेल्या मतदानासाठी आज नंदुरबार मध्ये शांततेत मतदान प्रक्रीया सुरु आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सहा पैकी शहादा, तळोदा आणि अक्कलकुवा या ०३ विविध कार्यकारी सोसायटीच्या जागा बिनविरोध झाल्या असुन आज उर्वरीत धडगाव, नवापुर आणि नंदुरबार या ०३ जागांसाठी मतदान प्रक्रीया होत आहे.

हे देखील पाहा :

११ वाजेपर्यंत धडगाव येथे 22 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून शंभर टक्के मतदान केलं आहे. तर, नंदुरबार मध्ये माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून अक्कलकुवा, धडगाव आणि नंदुरबार येथे शिवसेनेचे उमेदवार बाजी मारणार असल्याचे स्पष्ट केले आहे. नवापूर मध्ये ही मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. धुळे नंदुरबार मध्यवर्ती बँकेचे विभाजन होऊन नंदुरबारसाठी स्वतंत्र मध्यवर्ती बँक व्हावी ही शिवसनेची आक्रमक भुमिका राहीली होती.

नंदुरबार-धुळे संयुक्त DCC बँकेच्या १० जागांसाठी मतदान प्रक्रिया सुरळीत
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी मतदानाला सुरुवात; मविआ भाजपामध्ये काट्याची लढत

त्यामुळेच या बँकेची निवडणुक बिनविरोध होऊ शकलेली नाही. भाजपाचे प्राबल्य असलेल्या या बँकेवर पहिल्यांदाच महाविकास आघाडीच्या किसान संघर्ष पॅनलच्या माध्यमातुन विरोधी गट रिंगणात उतरला आहे. मात्र, या निवडणुकीत हवा तसा विरोध झालेला नसल्याचे महाविकास आघाडी स्पष्ट करत असुन आगामी काळात बँकेचे विभाजन होऊन धुळे नंदुरबार स्वतंत्र बँक न झाल्यास तीव्र विरोधाचा इशारा आज देण्यात आला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com