बैलपोळा साहित्य तयार करणाऱ्यांवर आली मोलमजुरी करण्याची वेळ

बैलपोळा सणासाठी तीन महिने मोठ्या प्रमाणात चालणारे काम आता पंधरा दिवसांवर येऊन ठेपले आहे.
बैलपोळा साहित्य तयार करणाऱ्यांवर आली  मोलमजुरी करण्याची वेळ
बैलपोळा साहित्य तयार करणाऱ्यांवर आली मोलमजुरी करण्याची वेळदिनू गावित

नंदुरबार: नंदुरबार शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या बद्रीजीरा गावात बैलपोळा साहित्य तयार करणारी तिसरी पिढी कार्यरत आहे, परंतु शेती मधील नवीन तंत्रामुळे बैलजोडी वापरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या घटल्याने व्यवसाय करणे कठीण झाले आहे. बैलपोळा सणासाठी तीन महिने मोठ्या प्रमाणात चालणारे काम आता पंधरा दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे येथील नागरिकांवर आता दुसरी मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील बद्रिजिरा गावात बैलांसाठी वापरण्यात येणाऱ्या नथ, गोंडा, घुंगरू, चाबूक पट्टा आदी साहित्य बनवुन आठवडी बाजार व खेड्या पाड्यावर जाऊन विक्रीतून आपला उदरनिर्वाह केला जातो. या गावात हे साहित्य बनवणारी आज तिसरी पिढी कार्यरत आहे. दरवर्षी बैलपोळा सण आला कि तीन महिने आधीच गोंडा बनवण्याच्या कामाला वेग येतो. यातून वर्षभराची कमाई पण होते.

बैलपोळा साहित्य तयार करणाऱ्यांवर आली  मोलमजुरी करण्याची वेळ
शिक्षक भर्तीवरुन नवप्राध्यापक संघटनेचा तोंडाला काळं फासत सरकाराचा निषेध

परंतु दिवसेंदिवस शेतीमध्ये आधुनिक तंत्राचा वापर वाढल्याने खेड्या पाड्यावर शेतकऱ्यांकडे बैल जोडी वापरण्याची संख्या घटल्याने, या गावातील नागरिकांवर आता हा व्यवसाय करणे कठीण झाले आहे. तसेच गेल्या वर्षीपासून कोरोनामुळे हा व्यवसाय पूर्णतः डबघाईला आला आहे. वर्षानुवर्षे चालत आलेला पारंपारिक व्यवसायातून उदरनिर्वाह होत नसल्याने येथील नागरिकांवर आता दुसरी मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे.

हे साहित्य तयार करण्यासाठी या नागरिकांना जळगाव हुन कच्चामाल आणून पुन्हा त्याच्यावर विणकाम करावे लागते. दिवसेंदिवस वाढलेल्या कच्च्या मालाच्या किमती तसेच साहित्य बनवल्यानंतर ही विक्रीसाठी येणाऱ्या अडचणी तसेच शेतकऱ्यांकडून खरेदीत मिळणारा अल्प प्रतिसाद या सार्‍या गोष्टींमुळे बद्रीजीरा गावातील या व्यवसायात तिसरी पिढी कार्यरत असलेल्या नागरिकांवर पारंपारिक व्यवसायातून उदरनिर्वाह चालवणे कठीण झाल्यामुळे इतर मजुरी करून घर चालवण्यावर भर दिला जातो.

Edited By: Pravin Dhamale

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com