Bhandara: वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडली; भंडारा-तुमसर राज्यमार्ग बंद तर १५० कुटुंबांचे स्थलांतर

Wainganga River Flood: भंडारा, तुमसर, मोहाडी या तालुक्यांना पुराचा फटका बसल्याने येथील तब्बल १५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवविण्यात आले आहे.
Wainganga River Flood News
Wainganga River Flood Newsअभिजीत घोरमारे

भंडारा: भंडारा (Bhandara) जिल्ह्याची जीवनदायिनी मानली जाणारी वैनगंगा नदीने (Wainganga River) धोक्याची पातळी ओलांडली आहे. नदीच्या पाण्याची पातळी ३ मीटरपेक्षा जास्त वाढली असल्याने भंडारा शहराला पुराचा (Flood) वेढा बसला आहे. याचा फटका भंडारा शहरालगत असलेल्या टाकली-खमाटा येथे बसला आहे. याठिकाणी पुराचे पाणी अडीच फुटावर आल्याने भंडारा-तुमसर राज्यमार्ग बंद झाला आहे. (Bhandara Latest News)

हे देखील पाहा -

भंडारा, तुमसर, मोहाडी या तालुक्यांना पुराचा फटका बसल्याने येथील तब्बल १५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवविण्यात आले आहे. भंडारा शहरातील ग्रामसेवक कॉलनी, टप्पा मोहल्ला, खमाटा, कपिल नगर, गणेश नगरी आदि शहरालगतच्या भागात पुराचे पाणी येत असल्याने जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून येथील लोकांना विस्थापित केले आहे. तर जिल्ह्यात भंडारा, तुमसर, मोहाडी या तालुक्यात पुराचा फटका बसल्याने येथील तब्बल १५० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवविण्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या पाण्याती पातळी सध्या स्थिर झाल्याने पुढील संभाव्य धोका सद्धा टळला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Wainganga River Flood News
लाईट आली! स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर मावळमधील धनगर वस्तीत पोहोचली वीज

वैनगंगा नदीचा पूर नियंत्रित करण्यासाठी गोसिखुर्द धरणाचे संपूर्ण 33 दरवाजे अडीच मीटरने उघडण्यात आले असून १५ हजार १८० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. विशेष म्हणजे २०२० नंतर पुन्हा २०२२ ला अशी पुरपरिस्थिती उद्भवली आहे.

Edited By - Akshay Baisane

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com