वालरस या जलचर प्राण्याच्या दातांच्या तस्करीचा पर्दाफाश, आरोपीला अटक

समुद्री सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वालरस या जलचर सस्तन प्राण्याच्या दातांची तस्करी उघडकीस आणण्यात आली आहे.
वालरस या जलचर प्राण्याच्या दातांच्या तस्करीचा पर्दाफाश, आरोपीला अटक
वालरस या जलचर प्राण्याच्या दातांच्या तस्करीचा पर्दाफाश, आरोपीला अटकओंकार कदम

सातारा: सातारा व रत्नागीरी वन विभागाने केलेल्या संयुक्त कारवाईत समुद्री सिंह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वालरस या जलचर सस्तन प्राण्याच्या दातांची तस्करी उघडकीस आणण्यात आली आहे. हातखंबा (जि. रत्नागीरी) येथे वन विभागाने कारवाई केली. (Walrus teeth smuggling, accused arrested)

हे देखील पहा -

वन विभागाला गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार हातखंबा येथे सापळा रचून रत्नागिरी आणि सातारा वनविभागाने संयुक्त कारवाई केली. त्यांना रत्नागीरी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने सहकार्य केले. त्यात तिघांना अटक झाली आहे. वन विभागाने सांगितले की, संबधित संशयितांकडून प्रथमच दुर्मिळ वॉलरस म्हणजेच समुद्री सिंह या प्राण्यांचे दात जप्त झाले आहेत. ते दात तस्करीच्या उद्देशाने शिकार करून मिळवले असण्याची शक्यताही वर्तवली आहे. त्यांच्याकडून आर्टीगा ही चार चाकी कारही जप्त केली आहे.

Walrus (वालरस)
Walrus (वालरस)Wikipedia

वालरस या जलचर प्राण्याचे शास्त्रीय नाव ओडोबेनुस रोझमरुस आहे, तर त्याला समुद्री सिंह म्हणूनही ओळखतात. वालरस हा तपकिरी रंगाचा अतिशय जाड आणि सुरकुतलेल्या कातडीचा व लांबलचक सुळे असणारा मोठ्या आकाराचा, पाण्यात राहणारा सस्तन प्राणी आहे. नर साधारण ४ मीटर लांबीचा व १३०० ते १५०० किलो वजनाचा असतो, तर मादी त्याच्या मानाने आकाराने लहान असते.

वालरस या जलचर प्राण्याच्या दातांच्या तस्करीचा पर्दाफाश, आरोपीला अटक
वन्य प्राण्यांचा हैदोस; पिकांचे नुकसान, शेतकरी हताश

अतिशय थंड बर्फावर किंवा बर्फाच्या थंड पाण्यात राहणे ते पसंत करतात. हा मांसाहारी प्राणी अन्नाच्या शोधात आर्क्टिकच्या पाण्यात खोलवर शोध घेतात. शेल फिश हे यांचे आवडते खाद्य. पाण्याच्या बाहेर अतिशय सावकाश आणि अवघडत हालचाली करणारा हा प्राणी पाण्यात मात्र खूप वेगवान हालचाली करू शकतो. नर घशातून विचित्र आवाज करत हल्ला करतात. अर्धवेळ पाण्यात राहणारा हा प्राणी उत्कृष्ट पोहतो.

Edited By - Akshay Baisane

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com