Wardha : जामठा येथील खदानीवर पथकाची धाड; दोन स्टोन क्रशर सील

11 लाख 50 हजाराचा ठोठावला दंड
Wardha News
Wardha NewsSaam Tv

चेतन व्यास

Wardha News : वर्धा (Wardha)तालुक्यातील जामठा येथे अवैधरित्या चालविण्यात येत असलेल्या खदानीवर धाड टाकून कारवाई करण्यात आली. या कारवाईत आढळून आलेले दोन स्टोन क्रशर जप्त करण्यात आले असून दोन वाहने व एक पोकलॅंड जमा करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या सुचनेप्रमाणे गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पथकाने ही कार्यवाही केली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी धाड टाकण्यात आलेल्या जामठा येथील या खदान परिसराची पाहणी करत जिल्हास्तरीय पथकामार्फत करण्यात आलेल्या कारवाईची माहिती त्यांनी जाणून घेतली.

Wardha News
Carnac Bridge Demolition: १५० वर्ष जुना कर्नाक ओव्हर ब्रिजच्या पाडकामाला सुरूवात; पुण्याहून मुंबईसाठी ४० जादा बसेस

अवैधरित्या उत्खनन झालेल्या क्षेत्राचे ईटीएस मशिनद्वारे मोजमाप करण्याचे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिले. अवैध उत्खननाचे परिमाण निश्चित करून दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना त्यांनी केल्या. जामठा खदान क्षेत्रावर यापुढे कोणत्याही प्रकारचे अवैध उत्खनन व वाहतूक होणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश देखील त्यांनी दिले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेप्रमाणे अवैध उत्खनन, वाहतूक व साठवणूकीस आळा घालण्यासाठी आकस्मिक पथके तयार करण्यात आली आहे. या पथकाच्या पहिल्याच धाडीत ही कारवाई करण्यात आली. जामठी येथील या खदानीचा साठा व विक्री परवान्याची मुदत संपुष्टात आली होती. असे असतांना देखील अवैधरित्या उत्खनन करून स्टोन क्रशर चालविण्यात येत होते. पथकाच्या धाडीत ही बाब समोर आल्याने कारवाई करण्यात आली.

खान परिसरात अवैधरीत्या वाहतूक करताना दोन वाहने व एक पोकलेन आढळून आला. दोन वाहनांसाठी ४ लाख तर पोकलेनसाठी ७ लाख ५० हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला. सदर दंडाची ११ लाख ५० हजार ईतकी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करण्यात आलेली आहे तसेच अवैधरित्या कार्यरत दोन स्टोन क्रशर देखील सील करण्यात आले आहे.

उत्खननाची परवाणगी असलेल्या खदान परिसरात मोठ्या प्रमाणात दगड गोट्यांचे उत्खनन केले जाते. त्यामुळे याठिकाणी कोणताही अपघात होऊ नये यासाठी सुरक्षात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या सर्व खदानींना तारेचे कुंपण करून घेण्याच्या सुचना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्यांना केल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com