Crime : नात्याला काळीमा फासणारी घटना; पुतण्याने केला काकूवर लैंगिक अत्याचार

शेतात निंदणीचे काम करणाऱ्या काकूवर तिच्याच सख्ख्या पुतण्याने अत्याचार केला आहे.
wardha crime news
wardha crime news saam tv

चेतन व्यास

Wardha Crime News : वर्धा (Wardha) जिल्ह्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घडली आहे. वर्ध्यातील दहेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या एका गावात घडली आहे. शेतात निंदणीचे काम करणाऱ्या काकूवर तिच्याच सख्ख्या पुतण्याने अत्याचार केला आहे. याप्रकरणी दहेगाव पोलिसांनी नराधम पुतण्यास अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

wardha crime news
मुलं पालकांना का सोडून जातात? 'या' कारणांमुळं ९० टक्के मुलं झाली बेपत्ता

मिळालेल्या माहितीनुसार, वर्धा जिल्ह्यातून धक्कादायक वृत्त समोर आलं आहे. ४५ वर्षीय महिला व तिचे जावई हे दोघे त्यांच्या मालकीच्या शेतात पऱ्हाटीच्या पिकाला निंदण करीत होते. दुपारी १.३० वाजेपर्यंत शेतात निंदणीचे काम केल्यावर जावई घरी जेवण करण्यास निघून गेले. पीडित महिला शेतात एकटीच होती. दरम्यान वासनांध पुतण्याने शेतात प्रवेश करुन काकूशी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. काकूने हटकले असता पुतण्याने बळजबरीने काकूवर अत्याचार केला. घाबरलेल्या काकूने पळ काढून ही बाब तिच्या सासऱ्यांना सांगितली. मात्र, तोपर्यंत आरोपी पुतण्याने तेथून पळ काढला होता.

दरम्यान, पीडितेने दहेगाव पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ अत्याचाराच्या कलमान्वये आरोपी पुतण्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलीसांनी सूत्र हलवत आरोपी पुतण्याचा शोध घेत अटक केली,अशी माहिती पोलीस निरीक्षक योगेश कामाले यांनी दिली.

wardha crime news
Wardha : जन्म दाखल्यावरुन वाद; नगरपालिकेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण

पोटच्या अल्पवयीन मुलीसोबत तीन वर्ष अश्लील चाळे; नराधम पित्यास अटक

पाचोरा (जळगाव) : तालुक्यातील एका गावात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील पंधरा वर्षीय अल्पवयीन पोटच्या मुलीसोबत गेल्या तीन वर्षांपासून अश्लील चाळे करून तिच्‍यासह आईला मारण्याची व घरातून हाकलून देण्याची धमकी देणाऱ्या नराधम पित्यास पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेमुळे सारा तालुका सुन्न व संतप्त झाला असून अशा नराधमास कठोर शिक्षेची मागणी समाज मनातून केली जात आहे. (Pachora Crime News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com