
दरवर्षी पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन सर्वच स्तरावरून केलं जातं. यालाच जोड वर्ध्यातील वैद्यकीय जनजागृती मंचानं दिली आहे. या उपक्रमाला आता नवीन रंग मिळू लागला आहे.
कारण यामुळे मूर्तीची विटंबना थांबली आणि पर्यावरण बचावचा उद्देशही साध्य झाला आहे. शिवाय गणेशोत्सवाचा तेवढाच आनंद कायम आहे. वर्ध्यात जनजागृती मंचाने प्लास्टर ऑफ पॅरीसच्या मूर्तीला अनोखा पर्याय दिला आहे. (Latest Marathi News)
वर्ध्यात(Wardha) मूर्ती विसर्जित केलेल्या गणपती मूर्तीच्या मातीपासून तयार करण्यात आल्या. या मुर्त्या ज्यांनी साकारल्यात तेही खासच... अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
कारण केमिकल इंजिनीअर असलेले नीरज शिंगोटे बावीस वर्ष जॉब करून आता मूर्ती साकारण्याचा लहानपणीचा छंद जोपासत आहेत. यंदा मूर्ती घडविण्याचा काम बऱ्याच वर्षांनी केलं. यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत पण घेतलीय. घडवलेल्या मूर्ती पहिल्यात तर कलाकृती दिसून पडतेय.
वर्ध्यात मूर्ती विसर्जित केलेल्या गणपती मूर्तीच्या मातीपासून तयार करण्यात आल्या. या मुर्त्या ज्यांनी साकारल्यात तेही खासच... अस म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
कारण केमिकल इंजिनीअर असलेले नीरज शिंगोटे बावीस वर्ष जॉब करून आता मूर्ती साकारण्याचा लहानपणीचा छंद जोपासत आहेत. यंदा मूर्ती घडविण्याचा काम बऱ्याच वर्षांनी केलं. यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत पण घेतलीय. घडवलेल्या मूर्ती पहिल्यात तर कलाकृती दिसून पडते आहे.
दरम्यान, याच उप्रक्रमात सहभाग देणारे दुसरे मूर्तिकार गजानन भांगे मूर्ती बनवून विकणे हा त्यांचा पोट भरण्याचा व्यवसाय आहे. मात्र हे करत असतांना पर्यवरणाशी ते बांधलकी जपत आहे. पण हे करताना ते एक हमी पत्र देतात आणि सांगतात साकारलेला मूर्ती या केवळ मातीचाच आहे. तेही वाटर कलरचं उपयोग करून बनविलेल्या. म्हणून पर्यावरण पूरक म्हणतांना कलर सुद्धा पाण्याला दुषित करणार याची काळजी त्यांनी घेतली आहे.
हळू हळू आता प्लास्टर ऑफ पॅरीसचं मूर्तची स्थापना करताना लोक टाळत आहे. पण याच प्रमाण वाढून शंभर टक्के ग्राहक जर मातीचीचं मूर्तीची मागणी करू लागल्यास विक्री सुद्धा मागणी नुसार होईल. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला हातभार लागेल. शिवाय एक नवीन पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच पर्व सुरु होण्यास मदत होईल.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.