Wardha Flood : वर्ध्यात पावासाचा हाहाकार; जिल्ह्यातील शेकडो नागरिकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन

राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसाने मुंबई, नवी मुंबई कोकणला पावसाने झोडपून काढले आहे. त्यानंतर वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आठही तालुक्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस (Rain) सुरू आहे.
wardha flood
wardha flood saam tv

अमर घटारे

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे. जोरदार पावसाने मुंबई, नवी मुंबई कोकणाला पावसाने झोडपून काढले आहे. त्यानंतर आता वर्धा (Wardha) जिल्ह्यातील आठही तालुक्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस (Rain) सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. काही भागत ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण झाल्याने वर्धा जिल्ह्यात 700 घरांमध्ये शिरले पाणी शिरले आहे. त्यामुळे वर्ध्यातील नागरिकांना पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. (Wardha Flood News In Marathi )

wardha flood
Dhule: जिल्‍ह्यात आतापर्यंत १६१ मीमी पाऊस; जलसाठ्यांच्या पाणी पातळीत वाढ

हिंगणघाट शहरालगत वणा नदी तसेच भाकरा नाल्याला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाणी पातळी वाढल्याने भाकरा नाल्याजवळ असलेल्या नगरांमध्ये मध्यरात्री पासून शेकडो नागरिक अडकले होते. या नागरिकांना वाचविण्यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक पोहचले. पहाटे चार वाजल्यापासून नागरिकांना सुटकेची प्रतिक्षा होती. SDRFची टीम दाखल झाल्याने बचाव कार्यात वाढ झाली आहे. आतापर्यत दीडशे नागरिकांना रेस्क्यू करीत सुखरूप सुरक्षा स्थळी पोहचविण्यात यश आले आहे.

वर्धा जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक गावामध्ये नदीचे पाणी सातेशहून अधिक गावांमध्ये शिरले आहे. त्यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आपत्ती व्यवस्थापनासोबत प्रशासन लोकांच्या मदतीसाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे. मुसळधार पावसामुळे नदीच्या किनाऱ्यावरील रस्ते देखील बंद करण्यात आले आहे.

wardha flood
Accident News | नर्मदेत एसटीचा भीषण अपघात, पाहा कसा झाला हा अपघात?

यवतमाळ जिल्ह्यातही जोरदार पाऊस

यवतमाळ जिल्ह्यात रविवारच्या रात्री पासून जोरदार पाऊस सुरू झाला आहे. काही तासात तीन तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी-नाले दुधडी भरून वाहू लागले आहेत. यात राळेगाव,बाभुळगांव आणि वणी तालुक्यात पुराच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी घराची पडझड देखील झाली आहे. आठवडाभरा आधीच जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, त्यात काल पासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com