Wardha: विसर्जित मातीतून पुढील वर्षी होणार श्रींची स्थापना

निर्माल्यातून होणार वृक्षांसाठी खत...
Wardha: विसर्जित मातीतून पुढील वर्षी होणार श्रीची स्थापना
Wardha: विसर्जित मातीतून पुढील वर्षी होणार श्रीची स्थापनाSaam Tv

वर्धा - पर्यावरण पूरक गणेश विसर्जना Ganpati Visarjan करिता हनुमान टेकडीवर Hanuman Tekadi दोन मोठे हौद तयार  करण्यात आले आहे. वैद्यकीय जनजागृती मंचाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या पर्यावरण पूरक गणेश उत्सवाला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार उपस्थित होत्या त्यांनी श्रीची आरती या वेळी केली.

तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे सिओ डॉ. सचिन ओंबासे यांनी आपल्या घरचा गणपती या कृत्रिम हौद मध्ये विसर्जित केला आहे. तर सांस्कृतिक ढोल ताशाच्या गजरात वर्धेकरांनी पर्यावरण पूरक गणेश विसर्जन करिता स्फुर्त प्रतिसाद देत आहेत. मागील वर्षी दहा हजार पर्यावरण पूरक गणेश मूर्तीचे विसर्जन झाले होते आता पर्यंत बहुतांश श्रीमूर्तीचे   विसर्जन झाले आहे .निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे या निर्माल्याचे खत तयार करून टेकडीवरील झाडांना देण्यात येत असून विसर्जनातून निघणाऱ्या मातीतून पुढील वर्षी गणपती लवकरच येतील असे व्हीजेएम सदस्यांनी सांगितले.

हे देखील पहा -

गणपतीचे विसर्जन आपण सर्वजण नदी किंवा ओढ्यामध्ये करायचं पण वर्धेत वैद्यकीय जनजागृती मंच आणि नगरपालिका यांनी कृत्रिम हौद तयार केल्यामुळे यात पीओपी आणि मातीच्या मूर्तीचे विसर्जन होत असल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही. तसेच नदी पात्राचे पाणी दूषित होणार नाही निर्मल्यासाठी  कुंड तयार केल्यामुळे त्याचे खतात रूपांतर केले जाते  ही चांगली बाब आहे असे जिल्हा परिषदेचे सीओ डॉ. सचिन ओंबासे यांनी सांगितले आहे .

जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिकांनी यावेळेस अतिशय साधेपणाने गणेश उत्सव पारपाडला आहे त्याबद्दल सगळ्यांचा खूप मनापासून अभिनंदन पुढील येणारे सर्व धार्मिक सण साध्या पद्धतीने साजरे करू पर्यावरणपूरक विसर्जना करिता वैद्यकीय जन जागृती मंच नगरपालिका आणि अन्य संस्थांनी पुढाकार घेतला त्यांचे अभिनंदन पुढच्या पिढीला चांगली पृथ्वी द्यायची आहे. त्याकरिता पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व अन्य कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे.

Wardha: विसर्जित मातीतून पुढील वर्षी होणार श्रीची स्थापना
लातुरात विसर्जनाची मिरवणूक नाही, संकलन केंद्रात मुर्त्या दान

वर्धे करांनी याला चांगला प्रतिसाद दिला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनीही आपल्या घरचा गणपती या कृत्रिम हौद मध्ये विसर्जित केला आहे. नदीपात्रात मूर्ती विसर्जन केल्यानंतर पूर्ण विसर्जित न झाल्यामुळे त्याची विकृती होते ती कृत्रिम हौदमुळे थांबेल आपण सांस्कृतिक बांधिलकी जोपासल्या जात आहे. हे नक्कीच चांगले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com