Wardha News: तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याविना मी राहू शकत नाही..पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीच्या नावे निनावी पत्राने खळबळ

तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याविना मी राहू शकत नाही..पीएचडी करणाऱ्या विद्यार्थिनीच्या नावे निनावी पत्राने खळबळ
Wardha News
Wardha NewsSaam tv

चेतन व्यास

वर्धा : मै आपसे प्यार करता हू, तेरी यादो मे मुझे रातभर निंद नही आती, असे म्हणत रात्री भेटण्यास न आल्यास बलात्कार करुन मारण्याची धमकी देणारे पत्र (Wardha News) वर्धेच्या महात्मा गांधी अंतराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या कुलपतींच्या ऑफीसमध्ये पीएचडी करणाऱ्या करणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या नावाने आले. तरुणीने याबाबतची तक्रार रामनगर पोलिसात दाखल केली असून पोलिसांनी (Police) अज्ञाताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. (Maharashtra News)

Wardha News
Crop Insurance: अतिवृष्‍टीने नुकसान झाले, पंचनामे केले; पिक विम्याची रक्कम मिळेना

आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात एक तरुणी पीएचडी पदवीचे शिक्षण (Education) घेत आहे. तिच्या नावाने कुलपतींच्या ऑफीसमध्ये निनावी पत्र आले. पत्र आल्यावर तरुणीला कुलपती कार्यालयात बोलवून पत्राची माहिती देण्यात आली. तरुणीने जात पत्र वाचले. यानंतर पत्रातील मजकूर वाचल्यावर तरुणीने थेट याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करत तपासाला सुरवात केली.

असा आहे पत्रातील मजकूर

पत्रात मी तुझ्यावर प्रेम करतो, तुझ्याविना मी राहू शकत नाही. रात्रभर तुझ्या आठवणीत मला झोप येत नाही. पत्र वाचल्यानंतर रात्री आठ वाजता गांधी गार्डनमध्ये भेटण्यासाठी ये, जर तु भेटायला आली नाही तर तुझ्यावर बलात्कार करेल, तु माझी न झाल्यास कुणाचीही होवू देणार नाही. असा मजकूर पत्रात लिहून होता.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com