Nitesh Rane : २०२४ मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू; नितेश राणेंचा घणाघात

२०२४ मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू असं नितेश राणे म्हणाले.
Nitesh Rane vs Amol Kolhe
Nitesh Rane vs Amol Kolhe Saam Tv

चेतन व्यास, साम टिव्ही

Nitesh Rane vs Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांच्याविषयी बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांची जीभ घसरली. २०२४ मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू असं नितेश राणे म्हणाले. इतकंच नाही तर, अमोल कोल्हे कुठेही भेटू दे त्याला दाखवतोच, अशा शब्दात राणेंनी घणाघात केला. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News)

Nitesh Rane vs Amol Kolhe
Pankaja Munde News : PM मोदींच्या दौऱ्यात सहभागी होणार नाही; पंकजा मुंडेंनी सांगितलं कारण

काय म्हणाले नितेश राणे?

भाजपा आमदार नितेश राणे हे वर्धा दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी बोलताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवर जोरदार टीकास्त्र सोडलं. काँग्रेस नेते राहुल गांधी विकासासंदर्भात बोलतायेत का? काँग्रेसचा एकही नेता विकासासंदर्भात बोलतो का? असा सवाल नितेश राणेंनी केला.

राहुल गांधी यांची कोणतेही पत्रकार परिषद बघा भारत जोडो यात्रेच्या संदर्भात. फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करायची. हिंदू धर्मावर टीका करायची. फक्त आमच्या साधू संतांवर टीका करायची. वीर सावरकरांवर टीका करायची. बाकी काहीच नाही, असं म्हणत राणेंनी राहुल गांधीवर टीका केली.

Nitesh Rane vs Amol Kolhe
Raj Thackeray News: राज ठाकरे १८ जानेवारीला परळी न्यायालयात हजर राहणार; काय आहे प्रकरण?

'२०२४ मध्ये अमोल कोल्हेंना आपटून टाकू'

यावेळी बोलताना नितेश राणे यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीकास्त्र सोडलं. 'कुठला तो अमोल कोल्हे नावाचा ॲक्टर. पैसे घेऊन शिवाजी महाराजांचे रोल करतो. तो काही फुकट करीत नाही. नावासाठी खासदार झालाय. २०२४ मध्य आपटून टाकू. एवढं काही मोठा विषय नाही. दाढी काढली तर कोणी ओळखणार पण नाही. तो सिरीयल पुरताच आहे, असा घणाघातही नितेश राणे यांनी केला.

Edited By - Satish Daud

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com