तांत्रिक विद्येचा वापर; तरुणाचा गळा आवळून खून

तांत्रिक विद्येचा वापर; तरुणाचा गळा आवळून खून
Crime News
Crime NewsSaam tv

किशोर कारंजेकर

वर्धा : मृत तरुण मानसिकरित्या अस्वस्थ असल्यामुळे त्याला उपचाराकरिता या आरोपींकडे आणण्यात आले होते. उपचाराच्या नावाखाली तांत्रिक विद्येचा वापर करीत २२ वर्षीय तरुणाचा गळा आवळून खून केल्याची घटना आर्वी येथील विठ्ठल वार्डात उघडकीस आली आहे. या प्रकरणी आर्वी पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल करून गुरुवारी रात्री उशिरा तीन आरोपींना अटक केली आहे. (wardha news crime news Young man strangled to death)

Crime News
यूट्यूबवरील व्हिडीओ पाहून 'तो' छापायचा नोटा, बसस्थानकात फिरत असतानाच नेमकं..

प्राप्त माहितीनुसार गणेश तुकाराम सोनकुसरे हे अमरावती येथे राहतात. त्यांचा मोठा मुलगा हा मानसिक रुग्ण असून उपचार सुरू होते. त्याला या तिन्ही आरोपींकडे उपचाराकरिता (Wardha News) आणण्यात आले होते. परंतु, आरोपींनी संगनमत करून तरुणाचा तांत्रिक विद्येप्रमाणे उपचार करून गळा आवळून खून (Crime News) केला. अब्दुल रहीम अब्दुल मजिद (वय ६०), अब्दुल जुनेद अब्दुल रहीम (वय २२), अब्दुल जमीर अब्दुल रहीम (वय २०, सर्व रा. विठ्ठल वॉर्ड आर्वी) अशी या आरोपींची नावे आहेत.

पुरावा केला नष्‍ट

तरुणाचा मृतदेह पोलिसांना कोणतीही माहिती देता दबाव टाकत वडिलांकडे सोपवत पुरावा नष्ट केला. याप्रकरणी वडील गणेश सोनकुसरे यांनी अमरावती कोतवाली पोलिसात तोंडी रिपोर्ट दिली. पोलिसांनी प्रॉव्हिजनल रिपोर्टवरून गुन्हा दाखल केला तसेच आर्वी पोलिसांत माहिती देऊन तेथेही गुन्हा नोंदविण्यात आला. घटनास्थळी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, ठाणेदार भानुदास पिदुरकर, फौजदार हर्षल नगरकर यांनी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक वाल्मिक बांबर्डे यांनी गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल नगरकर करीत आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com