Wardha News: अवैध व्यवसायिकाशी अर्थसंबंध ठेवणारे; तीन पोलिस कर्मचारी निलंबित

अवैध व्यवसायिकाशी अर्थसंबंध ठेवणारे; तीन पोलिस कर्मचारी निलंबीत
Wardha News
Wardha NewsSaam tv

चेतन व्यास

वर्धा : अवैध व्यवसायिकाकडून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप तीन पोलिस कर्मचाऱ्यांवर करण्यात आला. पोलिस (Police) अधीक्षक नुरुल हसन यांच्याकडे प्रकरण जाताच त्यांनी तिन्ही पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित केल्याचे आदेश जारी केले. पोलिस अधीक्षकांच्या या दणक्याने पोलिस वर्तुळात चांगलीच (Wardha News) खळबळ निर्माण झाली आहे. धीरज राठोड, राकेश इतवारे आणि पवन देशमुख असे निलंबित केलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहे. (Breaking Marathi News)

Wardha News
Sangli News: घरफोडी करणारी टोळी जेरबंद; दीड लाखाच्‍या मुद्देमालासह तिघे ताब्‍यात

धीरज राठोड, राकेश इतवारे व पवन देशमुख हे पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकात कार्यरत होते. त्यांनी इतवारा परिसरातील आनंदनगर भागातील रहिवासी एका अवैध व्यवसायिकाकडून ३० हजार रुपयांची मागणी करुन ती रक्कमही प्राप्त केल्याचा आरोप तिघांवर करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी घटनेची गंभीर दखल घेत तिन्ही कर्मचाऱ्यांना निलंबीत केले. या कारवाईमुळे पोलिस दलात चांगलीच खळबळ निर्माण झाली आहे.

Wardha News
Accident News: भरधाव ट्रॅक्टरचे टायर फुटले; ट्रॅक्‍टर उलटून युवकाचा मृत्‍यू

चौकशीसाठी अधिकाऱ्याची नियुक्ती

तिन्ही कर्मचाऱ्यांना निलंबित करत प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी एका अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. चौकशीत आणखी काय समोर येते यावर पुढील कारवाईची दिशा ठरविण्यात येणार असल्याची माहिती आहे. पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी रुजू होताच सांगितलं होत की कायदा सर्वांसाठी सारखा आहे. कोणीही गैरकृत्य करू नये. याचाच प्रत्यय अधीक्षकांनी भ्रष्ट तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करून दिलाय.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com