Wardha : पूर आणि अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हतबल; शिंदे सरकारचे दुर्लक्ष ?

शेतकऱ्यांच्या आश्वासनाचे काय झाले ? असा सवाल शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना करत आहे.
wardha news
wardha news saam tv

चेतन व्यास

Wardha News : पूर आणि अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ सप्टेंबरपर्यंत मदतीची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात दिले होते. मात्र, आतापर्यंत मदतीच्या नावाखाली एक पैसाही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. जिल्ह्यातील लाखो शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आश्वासनाचे काय झाले ? असा सवाल शेतकरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना करत आहे.

wardha news
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं राज्याच्या अर्थव्यवस्थेवर मोठं विधान; म्हणाले,'१ ट्रिलियन डॉलर..'

वर्धा जिल्ह्यात जुलै आणि महिन्यात दमदार पाऊस झाला. पावसामुळे जिल्ह्यात पूर परिस्थितीही निर्माण झाली होती. अतिवृष्टी आणी पुरामुळे जिल्ह्यातील २ लाख ५४ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. यामध्ये २ लाख ३२ हजार ६४६ शेतकरी बाधित झाले. नियमानुसार सरकारने ३४५.९९ कोटी मदतनिधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. राज्य सरकारने ८ सप्टेंबर रोजी शासन निर्णय काढत मदतीचा प्रस्ताव मंजूर केला होता. 15 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम जमा करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिले होते. मात्र आजपर्यंत एक पैसाही मिळालेला नाही.

wardha news
सामान्यांच्या अपेक्षापूर्तीसाठी राज्य शासन प्रयत्नशील, पण...; CM शिंदे यांचं मोठं विधान

दरम्यान, जिल्ह्यात एकूण २ लाख ३२ हजार ६४६ शेतकरी जुलै आणी ऑगस्ट महिन्यात आलेल्या पूर आणि अतिवृष्टीत बाधित झाले. यात वर्धा तालुक्यातील ३३ हजार ११, सेलू तालुक्यातील २७ हजार ३८६, देवळी तालुक्यातील ३० हजार ३४९, आर्वी तालुक्यातील २६ हजार ३९८, आष्टी तालुक्यातील १७ हजार ३८७, कारंजा तालुक्यातील २४ हजार ३, हिंगणघाट तालुक्यातील ३६ हजार ५३३ तर समुद्रपूर तालुक्यातील ३७ हजार ५७९ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com