वर्धा जिल्ह्यात जनावरांचा बाजार, शर्यत व प्रदर्शन भरविण्यावर बंदी

वर्धा जिल्ह्यात जनावरांचा बाजार, शर्यत व प्रदर्शन भरविण्यावर बंदी
Wardha Lumpy Virus
Wardha Lumpy VirusSaam tv

चेतन व्यास

वर्धा : राज्यात काही जिल्ह्यात जनावरांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. वर्धा (Wardha) जिल्ह्यात तूर्तास या रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. तरीही या रोगाचा (Lumpy Disease) प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन जनावरांचा बाजार भरवणे, शर्यती लावणे, जत्रा भरवणे व प्राण्यांच प्रदर्शन आयोजित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी तसे आदेश निर्गमित केले आहे. (Wardha News Lumpy Virus)

Wardha Lumpy Virus
विठ्ठल मंदिराचा सात मजली दर्शन मंडप पाडणार; बालाजी देवस्थानप्रमाणे विठुरायाची दर्शन रांग

राज्यातील (Jalgaon) जळगाव, अहमदनगर, अकोला, पुणे व धुळे (Dhule) या जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव आढळला आहे. जिल्ह्यात तुर्तास या रोगाचा शिरकाव झालेला नाही.प रंतु अहमनगर, पुणे, अकोला, अमरावती या जिल्ह्यातून वर्धा जिल्ह्यात जनावरांची खरेदी विक्री होत असल्याने आजारी जनावरांसोबत संपर्क येण्याची शक्यता आहे. या माध्यमातून लम्पीचा जिल्ह्यात प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी सदर उपाययोजना करण्यात आल्या आहे. पुढील आदेशापर्यंत हा आदेश लागू असणार असून आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहे.

आठवड्यातून एकदा फवारणी

गुरे व म्हैस वर्गीय प्राण्यांचा बाजार भरविणे, शर्यती लावणे, जत्रा भरविणे, प्रदर्शन आयेाजित करणे आणि प्राण्यांचे गट करुन किंवा त्यांना एकत्रित करुन कोणताही कार्यक्रम आयोजित करता येणार नाही. जिल्ह्यातील बाजारपेठेत, जत्रेत, प्रदर्शनामध्ये किंवा प्राण्यांच्या अन्य जमावामध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी बाधित गुरे व म्हशींना आणता येणार नाही. लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनावरांच्या गोठ्यामध्ये आणि जनावरांवर दर आठवड्यातून एकदा आळीपाळीने फवारणी करावी, असेही आदेश दिले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com