Wardha: बेपत्ता ‘ती’ चार मुले रेल्वेत चढताना सीसीटीव्हीत कैद

बेपत्ता ‘ती’ चार मुले रेल्वेत चढताना सीसीटीव्हीत कैद
Wardha News
Wardha NewsSaam tv

चेतन व्यास

वर्धा : जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील मसाळा येथील चार अल्पवयीन मुले शनिवारपासून बेपत्ता झाल्याने खळबळ माजली आहे. या प्रकरणी सेलू पोलिसांत (Police) अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीपासून मुलांच्या शोधात पोलीस असतांना ही चार अल्पवयीन मुले वर्धा रेल्वेस्थानक परिसरात असलेल्या (CCTV) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत कैद झाले आहे. एवढेच नव्हे तर ही मुले नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेत (Railway) चढल्याचेही यात दिसत आहे. मुलांचे सिसिटीव्ही समोर आल्याने पोलिसांनी आता त्या दिशेने तपास वळवत मुलांचा शोध घेत आहे. (Wardha Today News)

Wardha News
Latur: पोलिस ठाण्यासमोरच दगडे टाकून अडीच तास रस्ता अडवला; आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांचे आंदोलन

सदरची मुले रेल्वे स्थानकाच्या सिसिटीव्हीत आढळल्याने मुलांच्या (wardha) घातपाताची शंका दूर झाली आहे. रेल्वे पोलिसांना मुले बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच त्यांनी स्टेशनवरील सिसिटीव्हीची तपासणी सुरु केली होती. अखेर त्यांना यात यश आले. मसाळा (ता. सेलू) येथील पप्पू देवढे (वय 13), राज येदानी (वय 13), राजेंद्र येदानी (वय 12), संदीप भुरानी (वय 8) ही मुले शनिवारी ४.११ वाजताच्या सुमारास वर्धा रेल्वे स्टेशन परिसरात दाखल झाली. त्यानंतर ते रेल्वे स्थानकावर फेरफटका मारताना दिसून आले.

दोन तास फिरली मुले

जवळपास पावणे दोन तास ही मुले स्टेशन परिसरात वावरत होती. संध्याकाळी ६.२१ मिनिटांनी वर्धा रेल्वेस्थानकावर न थांबणारी १२९९३ क्रमांकाची पुरी– विकली सुपरफास्ट एक्सप्रेस तांत्रिक कारणांमुळे फलाट क्रमांक १ वर थांबली. ही गाडी थांबताच चारही अल्पवयीन मुले गाडीच्या वातानुकुलीत डब्यात चढताना सीसीटीव्हीत दिसून आली.

पोलिस पथक तत्‍काळ रवाना

ही सुपरफास्ट एक्सप्रेस ६.२४ मिनिटांनी पुढच्या दिशेने रवाना झाली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात मुले आढळल्याची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, रवींद्र गायकवाड यांनी आरपीएफ निरीक्षक रामसिंग मिना यांच्याशी संपर्क साधून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. मुले रेल्वे गाडीत चढताना दिसून आली. त्यामुळे पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास सोडून पुढील तपासासाठी तत्काळ पथकांना रवाना करण्याच्या सूचना दिल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com