Wardha News: धीरेंद्र महाराजांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन; संत तुकाराम महाराजाबद्दल केलेल्‍या वक्‍तव्‍याचा निषेध

धीरेंद्र महाराजांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन; संत तुकाराम महाराजाबद्दल केलेल्‍या वक्‍तव्‍याचा निषेध
Wardha News
Wardha NewsSaam tv

चेतन व्यास

वर्धा : बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी जगतगुरू संत तुकाराम महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याची क्लिप सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाली आहे. याविरोधात (Wardha News) सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. यानुसार धीरेंद्र महाराज यांचा निषेध करत प्रतिमेस जोडो मारो आंदोलन केले. (Breaking Marathi News)

तुकाराम महाराज यांच्‍याबद्दल केलेल्‍या वक्‍तव्‍याचा विविध सामजिक संघटनांच्यावतीने बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्री महाराजांचा निषेध नोंदविण्यात आला. वर्धा येथील छत्रपती शिवाज महाराज चौकात जगतगुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानकडून हे आंदोलन करण्यात आले. यावेळी बागेश्वर महाराजांच्या प्रवचनावर बंदी घालत त्यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी बागेश्वर महाराजांच्या फोटोला जोडेही मारण्यात आले.

Wardha News
Aurangabad News: भावाशी व्हिडिओ कॉलवर बोलतच संपविले जीवन; घरगुती वादाची शक्‍यता

कडक कायदा करा

वर्धेच्या शिवाजी चौकात जगतगुरू संत तुकाराम महाराज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आलेल्या या आंदोलनात पक्षभेद विसरून सर्वच एकत्र येत बागेश्वर धामच्या महाराजविरोधात आंदोलनात सहभाग नोंदवला. सरकारनेही महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या या महाराजांविरोधात कारवाई करावी. महाराजाच्या प्रवचनावर बंदी घालत अटक करावी. सोबतच महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांविरोधात कडक कायदा करावा; अशी मागणी यावेळी करण्यात आली.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com