Wardha News: धावत्या ट्रेनमध्ये प्रसुती कळा... अधिकारी, कर्मचाऱ्यांची धावपळ; रेल्वे प्रवासातच महिलेने दिला बाळाला जन्म

Women Gives Birth in Running Train: पुणे-नागपूर एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना महिलेने बाळाला जन्म दिला. आई अन् बाळ दोघेही सुखरूप आहेत.
Wardha News Women Gives Birth in Running Train
Wardha News Women Gives Birth in Running TrainSaamtv

चेतन व्यास, प्रतिनिधी

Wardha News: पुणे-नागपूर एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना महिलेने बाळाला जन्म दिल्याची बातमी समोर आली आहे. पुणे- नागपूर एक्सप्रेस वर्धा स्थानकावर थांबली असताना या महिलेला प्रसुती कळा सुरू झाल्या. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी सतर्कता दाखवून तत्काळ रेल्वे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने तिची प्रसुती केली. या महिलेने गोंडस मुलाला जन्म दिला.

Wardha News Women Gives Birth in Running Train
Marathwada Farmers News: धक्कादायक! ८ महिन्यांत मराठवाड्यातील ६८५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; कृषीमंत्र्यांच्या बीडमध्ये सर्वाधिक आत्महत्या

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सकाळी ८ वाजताच्या सुमारास पुणे- नागपूर एक्सप्रेस (Pune- Nagpur Express) ही रेल्वे वर्धा स्थानकावर आली. काही वेळात ट्रेन स्थानकावरुन सुटली असताना अचानक ‘चेन पुलींग’ झाल्याने पुन्हा स्थानकावर थांबवण्यात आली. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी रेल्वेची पाहणी केली असता रत्ना दयाल यादव (३०) रा. पारडी, नागपूर यांना प्रसुती कळा आल्याचे दिसले.

त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक रामसिंग मिना यांनी तात्काळ महिला कर्मचाऱ्यांना बोलावून स्टेशन मास्तरांना रेल्वेगाडी थांबवण्याच्या सूचना दिल्या. फलाटावर स्ट्रेचर तसेच हमलांना बोलावून रेल्वे रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलाविण्यात आले. बोगी रिकामी करुन पर्दे लावून महिला प्रधान आरक्षक कल्पना जाधव यांनी महिलेची नॉर्मल प्रसुती केली.

Wardha News Women Gives Birth in Running Train
Chandrashekhar Bawankule: कार्यकर्त्यांचा संयम सुटलाय; बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना इशारा

यावेळी आर.एस. मीना यांच्या मार्गदर्शनात एस. के कनोजिया, मिश्रा, घोडेकर यांनी देखील सतर्कता बाळगली. रेल्वेगाडीत महिलेची सुरक्षित प्रसुती केल्यानंतर रेल्वे रुग्णालयातील परिचारिका पूजा भगत, स्वाती वासनिक यांनी प्रसुत महिलेच्या नातेवाईकांशी संपर्क करुन प्रसुत महिले व नवजात बाळाला जिल्हा सामान्य रुग्णालयात सुरक्षितरित्या उपचारार्थ दाखल केले. (Latest Marathi News)

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com