Bogus Cotton Seeds: एसआयटीचे पथक गुजरातला होणार रवाना; बोगस कापूस बियाणे कारखाना प्रकरण

एसआयटीचे पथक गुजरातला होणार रवाना; बोगस कापूस बियाणे कारखाना प्रकरण
Bogus Cotton Seeds
Bogus Cotton SeedsSaam tv

चेतन व्‍यास

वर्धा : वर्ध्यातील म्हसाळा परिसरात सुरू असलेल्या कपाशीच्या बनावट बियाणे (Bogus Seeds) कारखान्यावर पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांच्या सूचनेनुसार छापा टाकून सुमारे १ कोटी ५१ लाख ८२ हजार रुपयांचे बियाणे जप्त केले होते. पोलिसांना (Police) हे प्रकरण 'मॅनेज' करण्यासाठी तब्बल ३० लाख रुपयांची 'ऑफर' मुख्य सूत्रधार राजू जयस्वाल याने दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. मात्र, पोलिसांनी या ऑफरला पायदळी तुडवून या टोळीचा पर्दाफाश केला. प्रकरणाच्या (Wardha) तपासाकरिता पोलीस अधीक्षकांनी एसआयटीची स्थापना केली आहे. आज एसआयटीचा एक पथक गुजरात राज्यात रवाना होणार आहे. (Latest Marathi News)

Bogus Cotton Seeds
Beed Crime News: नीट परीक्षेनं होत्याचं नव्हतं झालं; अपयश आलं अन् हसत्या खेळत्या मुलीनं मृत्यूला कवटाळलं

मागील तीन वर्षांपासून राजू जयस्वाल हा बोगस कापूस बियाण्याचा कारभार करत होता. २०२० मध्ये तो मध्यप्रदेशच्या पांढुर्णा येथून बोगस बियाणे आणून रिपॅकिंग करत होता. तर २०२१ पासून गुजरात राज्याच्या अहमदाबाद जिल्ह्याच्या ईडर येथून बियाणे बोलवत होता. याच प्रकरणाचा तपास करण्यासाठी आज स्थापन केलेल्या एसआयटीमधील एक पथक गुजरातला जाणार आहे. गुजरात येथून प्रकरणातील अन्य आरोपीसह बियाणे निर्मितीच्या गोरखधंदा उघडकीस आणणार आहे. प्रकरणात आतापर्यंत दहा आरोपी अटकेत असून इतर आरोपीचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Bogus Cotton Seeds
Gautami Patil Dance Program: गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात प्रेक्षकांची हुल्लडबाजी; अवघ्या 5 मिनिटात कार्यक्रम पडला बंद

मागील तीन वर्षांपासून सुरु आलेल्या या बोगस बियाण्याच्या काळाबाजारमुळे अनेक शेतकरी फसले गेले आहे. या वर्षीही शेतकऱ्यांना (Farmer) मोठ्या प्रमाणात बोगस कपाशी बियाणे देण्याचा कट आरोपीचा होता. मात्र पोलिसांनी तो उधळून लावत अनेक शेतकऱ्यांना संकटातून वाचविले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com