गनिमी कावा : विठ्ठलाच्या घाेषात मानाची दिंडी पंढरपुरात दाखल

गनिमी कावा : विठ्ठलाच्या घाेषात मानाची दिंडी पंढरपुरात दाखल
Warkari pandharpur

पंढरपूर : महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव corona pandemic नियंत्रणात ठेवण्यासाठी राज्य सरकारने यंदाही पंढरपूरला pandharpur जाणा-या पायी वा-यांना बंदी घातली आहे. तरी राज्यातील काही वारक-यांनी एकत्रित येत दिंड्या काढल्या. त्यातील काही दिंड्यांना पाेलिसांनी त्या त्या ठिकाणीच अडविले. तरीही पंढरपूरात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाची वास्कर दिंडी गनिमी काव्याने पंढरीत दाखल झाली. (warkari-reached-pandharpur-wari2021-trending-news)

आळंदीहून पोलिसांचा ससेमिरा चुकवीत दादा महाराज शिरवळकर दिंडी आळंदीहून निघाली होती. परंतु दिवे घाटात या दिंडीला पोलिसांनी अडवून त्यांना पुढे जाण्यास अटकाव केला हाेता. बहुतांश वारक-यांना पुन्हा माघारी पाठविण्यात आले. वेगवगेळ्या दिंडीवर अटकावाचे सत्र सुरू असतानाच माऊलींच्या पालखी सोहळ्यातील मानाची तात्यासाहेब वास्कर दिंडी पोलिसांना गुंगारा देत पंढरपुरात पोहोचली.

खांद्यावर भागवत धर्माची पताका, हाती टाळ खांद्यावर वीणा आणि मुखी रामकृष्ण हरी नामाचा जयघोष करीत ही दिंडी पंढरपुरात बुधवारी दाखल झाली. सात दिवसात आळंदी ते पंढरपूर या दिंडीने पूर्ण केले. या दिंडीतील वारक-यांनी चंद्रभागेत स्नान केले. संत नामदेव पायरीचे दर्शन घेवून नगरप्रदिक्षणाही पूर्ण केली. दरम्यान संचारबंदीपूर्वीच वारकरी पंढरीत येऊ लागले आहेत असेही चित्र स्पष्ट झाले आहे.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com