सरकारच्या निषेधार्थ पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या बाहेर वारकऱ्यांचे आंदोलन

साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या बाहेर वारकऱ्यांनी टाळ - मृदुंगच्या सहाय्याने विठुरायाची गाणी म्हणत राज्य सरकारचा निषेध केला आहे.
सरकारच्या निषेधार्थ पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या बाहेर वारकऱ्यांचे आंदोलन
सरकारच्या निषेधार्थ पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या बाहेर वारकऱ्यांचे आंदोलनभूषण अहिरे

धुळे - साक्री तालुक्यातील पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या Pimpalner police station बाहेर वारकऱ्यांनी टाळ - मृदुंगच्या सहाय्याने विठुरायाची गाणी म्हणत राज्य सरकारचा government निषेध केला आहे. Warkaris protest राज्य सरकार 3000 पोलीस आषाढी एकादशीच्या निमित्ताने तैनात करू शकतात, परंतु तीनशे वारकऱ्यांना देखील परवानगी देऊ शकत नाही. असं म्हणत ठाकरे सरकारचा thackeray government याठिकाणी वारकऱ्यांतर्फे निषेध करण्यात आला आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने वारकरी संप्रदाय हा पायी दिंडी घेऊन विठुरायाच्या भेटीला जात असतो. परंतु यंदा कोरोनाचं कारण पुढे करीत सरकारने पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना मज्जाव केला आहे. त्यामुळेच वारकऱ्यांचा मोठा हीरमोड झाला आहे. Warkaris protest outside Pimpalner police station to protest against the government

हे देखील पहा -

ठाकरे सरकारने पायी जाणाऱ्या वारकऱ्यांना मज्जाव करण्यासाठी त्याठिकाणी जवळपास तीन हजार पोलिस तैनात केले आहेत. परंतु या तीन हजार पोलिसांना तैनात करण्याऐवजी तीनशे वारकऱ्यांना परवानगी ठाकरे सरकारने देणं अपेक्षित होतं, परंतु असं न करता राज्य सरकारतर्फे त्याठिकाणी तीन हजार पोलिस तैनात केले आहेत. परंतु तीनशे वारकऱ्यांना देखील वारीसाठी परवानगी नाकारली असल्याकारणाने वारकरी संप्रदायातील नाराज वारकऱ्यांनी थेट पोलीस ठाण्याच्या बाहेरच राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन केल आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com