
Amravati Warm Water News: विहीर म्हटल्यावर त्यात थंडगार पाणी असणार असं सर्वजण म्हणतात. गावी गेल्यावर थंड पाण्याची तहान भागवण्यासाठी सर्वच विहीरीकडे धाव घेतात. अशात तुम्ही कधी गरम पाण्याची विहीर ऐकलीये का? फक्त गरम नाही तर उकळत्या पाण्याची विहीर. (Latest Warm Water Well News)
उकळत्या पाण्याची विहीर ऐकून तुम्हलाही आश्चर्य वाटलं असेल. सध्या या व्हिहिरीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. या विहीरीची खास बात म्हणजे यातून उकळतं पाणी येत आहे. गावातल्या विहीरीतून असं उकळणारं पाणी बाहेर येत असल्यने सर्वांनाच याचे आश्चर्य वाटले आहे. गावकऱ्यांनी हे पाणी पाहण्यास मोठी गर्दी केलीये.
अमरावती जिल्ह्यातील बेनोडा या गावात ही घटना घडलीये. हरिषचंद्र संपतराव वाघ यांच्या घरातील अंगणात ही विहीर आहे. गेल्या चार दिवसांपासून अचानक या विहीरीतून गरम पाणी येण्यास सुरुवात झाली आहे.भूजल सर्वेक्षण विभागाच्या वैज्ञानीकांनी या विहिरीची पाहाणी केली आहे.
तसेच या पाण्याचे नमुने प्रयोग शाळेत तपासण्यासाठी पाठवण्यात आले आहेत. विहिरीतून येणारं हे गरम पाणी नेमके कशाचे संकेत आहेत असा प्रश्न गावकऱ्यांना पडलाय.
गरम पाण्याच्या अशा विहीरी आणखीन काही ठिकाणी आढळल्या आहेत. बिहार आणि उत्तरप्रदेशसह बऱ्याच ठिकाणी अशा पद्धतीने उकळत्या पाण्याचे स्त्रोत आढळून आलेत. सध्या अमरावतीममध्ये सापडलेली ही विहीर पाहून देखील नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.