महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता

देशभरात मुसळधार पाऊस पुन्हा सक्रिय झाल्याने या आठवड्यात कोकणात पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता
महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यताSaam Tv

देशभरात मुसळधार पाऊस rains पुन्हा सक्रिय झाल्याने या आठवड्यात कोकणात Konkan पुन्हा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये Ratnagiri रेड अलर्ट Red alert जाहीर करण्यात आले आहे. या काळात काही ठिकाणी २० सेंटीमीटरहून अधिक पावसाचा अंदाज आहे. Warning of heavy rains in Maharashtra

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली आणि कोल्हापूर Kolhapur जिल्ह्यामधील अनेक ठिकाणी पावसाने झोडपून काढले आहे. धुळे, सातारा, सोलापूर, नांदेड, परभणी व उस्मानाबाद Osmanabad या जिल्ह्यांमध्ये देखील मध्यम स्वरुपाचे सरी कोसळले जाणार आहे. पुन्हा राज्यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हे देखील पहा-

पुढील २४ तासात दक्षिण कोकणासह मध्य महाराष्ट्र Maharashtra व पश्चिम महाराष्ट्रमधील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुन्हा सक्रिय झालेल्या, मान्सूनमुळे कोकण व मध्य महाराष्ट्रमधील काही भागात १२ ते १५ जुलै दरम्यान अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. भारतीय हवामान विभागाने सांगितलेल्या माहितीनुसार, १२ जुलै दिवशी कोकण व गोव्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. Warning of heavy rains in Maharashtra

काही विभागात अतिवृष्टी होणार आहे. मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. १३ आणि १४ जुलै दिवशी विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, घाट विभागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सातारा, कोल्हापूर व रायगड Raigad या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केले आहे.

महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा, जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा

याठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आकाशात विजांचा गडगडाट होत असताना, घराबाहेर पडू नये आणि मोठ- मोठ्या झाडाच्या आडोशाला उभे राहू नये, असे सल्ले हवामान खात्याने तज्ज्ञांकडून दिले आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात बहुतांशी जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केले आहे. Warning of heavy rains in Maharashtra

यामुळे पुणे, अहमदनगर, नाशिक, पालघर, ठाणे या जिल्ह्यासहीत मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचे पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर सांगली, सोलापूर, परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यामध्ये कोरडे हवामान असण्याची शक्यता आहे. संबंधित जिल्ह्यांमध्ये तुरळक काही विभागात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com