
मनोज जयस्वाल
वाशिम : नागपूरवरून पुणेसाठी निघालेली पर्पल ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गवर चालत्या ट्रकला मागून धडक दिल्याची घटना (Washim) वाशिम जिल्ह्यातील लोकेशन १६४ जवळ घडली. यात १२ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. तर उर्वरित प्रवासी किरकोळ (Samruddhi Highway) जखमी झाले. रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गावर घडली. (Latest Marathi News)
समृद्धी महामार्गावर झालेला अपघात एवढा जबरदस्त होता की ट्रॅव्हल्सचा चालक हा टँकर आणि ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये अडकून होता. समृद्धी अग्निशामक दल व १०८ पायलट यांनी त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तब्बल अर्धा ते पाऊण तास तो ट्रॅव्हलच्या केबिनमध्ये अडकून पडलेला होता. अत्यंत विचित्र अपघात (Accident) झाल्यामुळे ट्रॅव्हल्समधले काही प्रवासी वरच्या बर्थवरून खालच्या बर्थवर पडले. त्यामुळे बऱ्याच रुग्णाचे पाय व हात फॅक्चर झाले आहेत. त्यावेळी प्रामुख्याने कारंजा (Samruddhi Mahamarg) शहरसर पोलीस स्टेशनचे पीएसआय वानखडे, पोलीस गणेश नागरीकर, प्रतीक राऊत व अमरावती (Amaravati) ग्रामीण पोलीस मदतीसाठी हजर होते.
अपघाताची माहिती तात्काळ १०८ समृद्धी लोकेशन कारंजा डॉ. गणेश व पायलट आशिष चव्हाण १०८ समृद्धी लोकेशन शेलुबाजार डॉ. सचिन आटोळे व पायलट प्रमोद ठाकरे १०८ समृद्धी लोकेशन शिवनी व श्री गुरमंदिर रुग्णवाहिका सेवाचे रुग्णक्षेवक रमेश देशमुख हे सर्व रुग्णवाहिका घेऊन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अपघात ग्रस्त रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे दाखल केले.
अपघातातील जखमी
अपघातात हर्षल रामदास पाटील (वय ४१), योगिता गणेश भुते (वय ४७), कुणाल सुनील भोजने (वय २०), अश्विन विलास मोरकर (वय २४), मोनाली गाडेकर (वय ४२), राकेश बुते (वय ३८), सायली धाडवे (वय ४२), नवनाथ मोहिते (वय ४२), अभिषेक वानखडे (वय ४०), मंजू योगेश बुते (वय ४०), वैष्णवी काळे (वय २४), सुमित सावितकर (वय ४५) अशी जखमी आहेत.
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.