Scrub Typhus Disease in Washim: वाशिममध्ये 'स्क्रब टायफस'चा शिरकाव; आरोग्य विभाग हाय अलर्टवर, दुर्मिळ आजार होतो कसा?

Scrub Typhus Disease in Washim : वाशिमच्या कामरगाव येथे दुर्मिळ असलेल्या 'स्क्रब टायफस' या आजाराचा रुग्ण आढळला आहे.
Scrub Typhus Disease in Washim
Scrub Typhus Disease in WashimSaam tv

मनोज जयस्वाल,वाशिम

Scrub Typhus Disease in Washim:

वाशिममधून मोठं वृत्त हाती आलं आहे. वाशिमच्या कामरगाव येथे दुर्मिळ असलेल्या 'स्क्रब टायफस' या आजाराचा रुग्ण आढळला आहे. यामुळे आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. (Latest Marathi News)

वाशिममध्ये ६० वर्षीय व्यक्तीला 'स्क्रब टायफस' आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दुर्मिळ असलेल्या 'स्क्रब टायफस' या आजाराने बाधित झालेल्या रुग्णाचे नमुने १ सप्टेंबरला दिल्ली येथील 'ऑल इंडिया मेडिकल इन्टिट्यूट ऑफ सायन्स'च्या (एम्स) प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.

Scrub Typhus Disease in Washim
Maratha Reservation: आरक्षणासाठी जाती धर्मांमध्ये भांडण लावून कोणीही फायदा घेऊ नये: पंकजा मुंडे

'स्क्रब टायफस' आजार झालेल्या व्यक्तीचा नमुन्याचा अहवाल 'ऑल इंडिया मेडिकल इन्टिट्यूट ऑफ सायन्स'कडून प्राप्त झाला. त्यानंतर हा व्यक्ती 'स्क्रब टायफास'ने बाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे.

'स्क्रब टायफस' आजार कसा होतो?

उंदरांचं प्रमाण अधिक असणारा भाग किंवा घनटाट गवताची उगवण ज्या ठिकाणी होते, त्या ठिकाणी 'माईट' नावाचा किटक आढळतो. या किटकाच्या चावण्याने 'स्क्रब टायफस' दुर्मिळ आजार होतो, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Scrub Typhus Disease in Washim
Yavatmal Accident: घट्ट धरलेला हात सुटला अन् मुलाच्या डोळ्यांसमोर आई वाहून गेली; यवतमाळमधील मन सुन्न करणारी घटना

तत्पूर्वी, गेल्या काही वर्षांत या आजाराचे अनेक रुग्ण राज्यातील काही जिल्ह्यात आढळले आहेत. वाशिम जिल्ह्यात प्रथमच कामरगाव येथे ६० वर्षीय व्यक्तीला 'स्क्रब टायफस'ची लागण झाल्याचे समोर आले आहे.

रक्त नमुने तपासल्यानंतर ही बाब निष्पन्न झाली. हा आजार झालेल्या रुग्णावर योग्य उपचार करण्यात आले आहेत. सध्या त्या रुग्णाची प्रकृती सध्या धोक्याबाहेर असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV | साम टीव्ही
www.saamtv.com