Washim Crime News : चालत्या बसमध्ये कंडक्टरकडून महिलेचा विनयभंग

घटनेनंतर महिलेने पाेलिस ठाण्यात धाव घेतली.
washim crime news, bus conductor arrested in molesting case
washim crime news, bus conductor arrested in molesting caseSaam Tv

- मनोज जयस्वाल

Washim News : चालत्या बसमध्ये कंडक्टरने महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी पाेलिसांनी बस कंडक्टरला अटक केली आहे. ही घटना वाशिम (washim) जिल्ह्यात मंगळवारी घडली हाेती. या घटनेनंतर महिलेने पाेलिस (police) ठाण्यात धाव घेतली हाेती. (Maharashtra News)

washim crime news, bus conductor arrested in molesting case
NEET परीक्षेतील 'त्या' प्रकरणावर राज्य महिला आयाेग आक्रमक; वैद्यकीय शिक्षण मंडळास दाेन दिवसांचा अल्टीमेटम (पाहा व्हिडिओ)

या घटनेबाबत रिसाेड पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी : मंगळवारी (ता. ९ मे) दुपारी तीनच्या सुमारास वाशीम येथून रिसोड तालुक्यातील एका गावात पीडित महिला तिच्या माहेरी जाण्यासाठी बसमध्ये बसली होती. त्या बसमध्ये प्रवाशांची खूप गर्दी होती. बस कंडक्टरने पीडित महिलेला जागा देण्याच्या बहाण्याने विनयभंग केला.

washim crime news, bus conductor arrested in molesting case
Nana Patole News : सरकार किती घाबरतंय बघा, असं का म्हणाले नाना पटाेले ? (पाहा व्हिडिओ)

या प्रकारानंतर पीडित महिला रिसाेड पाेलिस ठाण्यात आली. तिने घडलेल्या प्रकाराची माहिती पाेलिसांना दिली. पोलिसांनी तिच्या तक्रारीनूसार बस कंडक्टरवर (कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करून त्यास अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com