अमित देशमुखांचा हा स्वागत सोहळा बघा; नियम केवळ सामान्यांसाठीच का?

स्वागताला क्रेन, अवाढव्य फुलांचा हार, फुलांच्या वर्षावासाठी जेसीबी अन हजारो कार्यकर्त्यांची तोबा गर्दी!उदगीरात अमित देशमुख यांच्या जंगी मिरवणुकीत कोरोना नियम सपशेल पायदळी तुडवले गेले.
अमित देशमुखांचा हा स्वागत सोहळा बघा; नियम केवळ सामान्यांसाठीच का?
अमित देशमुखांचा हा स्वागत सोहळा बघा; नियम केवळ सामान्यांसाठीच का?दीपक क्षीरसागर

लातूर : संपूर्ण जग सध्या करोना संसर्गाशी दोन हात करत आहे. लाखो लोकांचा बळी देशभरात गेला आहे. यामुळे देशपातळीवर सर्वसामान्य लोकांवर समाजात वावरताना अनेक बंधने लादण्यात आली आहेत. लग्न, मुंज आणि धार्मिक कार्यक्रमावर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. असे असताना राजकीय नेत्यांच्या सभा, आंदोलने आणि मेळावे यासाठी मात्र कोणतीही बंधने नसल्याचे वेळोवेळी दिसत आहे.

हे देखील पहा :

लातूरचे पालकमंत्री अमित देशमुख हे आज उदगीर शहरात विविध कार्यक्रमासाठी हजर होते. त्यांच्या स्वागतासाठी उदगीर शहर सजविण्यात आले होते. राज्यमंत्री संजय बनसोडे याच मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते हि या स्वागतप्रसंगी हजर होते. काही महिन्यात उदगीर नगरपालिकेच्या निवडणुका अपेक्षित आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने जोरदार शक्ती प्रदर्शन सुरु केल्याचे दिसत आहे.

अमित देशमुखांचा हा स्वागत सोहळा बघा; नियम केवळ सामान्यांसाठीच का?
Pune : अबब..! पुणे महापालिकेचा कर्मचारी निघाला चोर

अमित देशमुख यांच्या स्वागतासाठी जेसीबी तुन फुलांची उधळण करण्यात आली. तर जेसीबीला अवाढव्य हार लावण्यात आला होता. यावेळी मोठ्या संख्यने कार्यकर्ते हजर होते. आजच गणपती स्थापना होत असताना सामान्यांसाठी अनेक प्रकारची बंधने लावण्यात आली आहेत. मात्र ह्या राजकीय स्टंटला कोणतेही आडकाठी नसल्यामुळे गणेशभक्तांतून मोठ्याप्रमाणावर नाराजी व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com