सिंधुदुर्गातील नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या इशाऱ्यापर्यंत

खारेपाटण पुलाजवळ आज मोजलेल्या पाणीपातळीनुसार वाघोटन नदीची पातळी 6.000 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे.
सिंधुदुर्गातील नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या इशाऱ्यापर्यंत
सिंधुदुर्गातील नद्यांची पाणी पातळी धोक्याच्या इशाऱ्यापर्यंतSaam Tv News

सिंधुदुर्ग - खारेपाटण पुलाजवळ आज मोजलेल्या पाणीपातळीनुसार वाघोटन नदीची पातळी 6.000 मीटर इतकी असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे. या नदीची इशारापातळी 8.500 मीटर आहे, तर धोका पातळी 10.500 मीटर आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी याठिकाणी 39.900 मीटर आहे. या नदीची इशारा पातळी 41.600 मीटर आहे आणि धोका पातळी 43.600 मीटर इतकी आहे. Water level of rivers in Sindhudurg up to danger signal

हे देखील पहा -

जिल्ह्यातल्या कुडाळ पावशी येथील भंगसाळ पुलाजवळ रात्री 8.35 वाजता मोजलेल्या पाणीपातळीनुसार कर्ली नदीची पाणी पातळी 9 मीटर असल्याची माहिती दक्षिण कोकण पाटबंधारे प्रकल्प मंडळ यांनी दिली आहे. या नदीची इशारापातळी 9.910 मीटर असून धोका पातळी 10.910 मीटर आहे. तरी नदी किनाऱ्यावरील नागरिकांनी सतर्क रहावे असेआव्हान करण्यात आले आहे. कुडाळ, आंबेडकरनगर येथील पुरामुळे बाधित होणारी 6 कुटुंबांना (25 व्यक्ती) सुरक्षित ठिकाणी असणाऱ्या नातेवाईकांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले आहे.

Edited By - Akshay Baisane

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com